स्वदेशी आंदोलकांवर इराण पोलिसांचा गोळीबार, विमान पाडल्याचे देशभर पडसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र | इराण सरकारने चुकून युक्रेनचं विमान पाडल्याची कबुली दिल्यानंतर लोक निषेधासाठी रस्त्यावर उतरले. इराण सुरुवातीला या अपघाताची जबाबदारी घ्यायला टाळाटाळ करीत होता, परंतु आंतरराष्ट्रीय दबावानंतर ती जबाबदारी इराणला स्वीकारावी लागली.

एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये असे दिसून येते की पोलिसांकडून निषेधासाठी रस्त्यावर आलेल्या लोकांवर गोळ्या झाडल्या गेल्या.

एका व्हिडिओमध्ये असे दिसून आले की काही लोक एका महिलेला घेऊन जात आहेत आणि त्या महिलेच्या पायातून रक्तस्त्राव होतो आहे. याशिवाय एका व्हिडिओमध्ये लोक अश्रुधुराचे कवच सोडण्याविषयी बोलत आहेत. इराणच्या पोलिस जनरलने मात्र याला नकार दिला. ते म्हणतात की निदर्शकांना गोळ्या घालण्यात आल्या नव्हत्या आणि संयम राखून लोकांचे नियंत्रण केले गेले.

https://youtu.be/rUa7fquYxis

ट्रम्प यांचा इशारा

इराणमधील निदर्शने पाहता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला की पुन्हा तेथे हत्याकांड घडल्यास ते हस्तक्षेप करतील. ट्रम्प म्हणाले होते की इराणच्या सर्व कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तेहरानमधील एका विद्यापीठाबाहेर जमलेल्या निदर्शकांनी सांगितले की, “ते (इराणी सरकार) खोटे बोलत आहेत की अमेरिका आपला शत्रू आहे, आपला तर शत्रू इथे आहे.” निदर्शने करणाऱ्यांचा हा व्हिडिओ ट्विटरवरही शेअर करण्यात आला.

इराणच्या क्षेपणास्त्रामुळे विमानाचा अपघात

युक्रेन आंतरराष्ट्रीय हवाईसेवेच्या विमानाने उड्डाण घेतल्याच्या काही मिनिटानंतर विमानाला आगीने घेरलं. बुधवारी विमान अपघातात सर्व प्रवासी मरण पावले. विमानात बसलेल्या बहुतांश प्रवाश्यांकडे दुहेरी नागरिकत्व होते. ५७ प्रवाश्यांकडे कॅनेडियन पासपोर्ट होते. मानवी चुकांमुळे हा अपघात झाल्याचे सांगून इराणने सावध प्रतिक्रिया दिली आहे.