धक्कादायक! शिवसेनेला मत देऊ नका अशी चिठ्ठी लिहून शेतकर्‍यांची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी

उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तड़वळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने फसवणूक झाल्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. घटनास्थळी जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे तर ओमराजे यांनी कारखान्याने बँकेत रक्कम जमा केली होती त्यात बँकेची चूक असल्याचा खुलासा केला आहे.

तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची जमीन वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती. कारखान्याने कर्ज न भरल्याने बँकेने ढवळे यांच्या जमिन लिलावात काढली होती. या तणावामुळे ढवळे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी ढवळे यांच्या खिशात २ वेगवेळ्या चिट्ठ्या सापडल्या त्यातील एका चिट्ठीत त्यांनी आत्महत्येस ओमराजे निंबाळकर व वसंत दादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे तर दुसऱ्या चिठ्ठीत  १३ शेतकऱ्यांनी तेरणा कारखाना बाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र भेट झाली नाही असे सांगत व्यथा मांडल्या आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे लोकसभा उमेदवार ओमराजे याना मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस या दोन्ही चिठ्ठीची शहानिशा करत असून पुढील चौकशी करीत आहेत. या प्रकरणी ढोकी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तेरणा कारखाण्याने बँकेत पैसे जमा केले होते मात्र बँकेची चूक असल्याने ते पैसे संबंधित शेतकरी खात्यावर जमा झाले नाहीत आम्ही कायम ठेकेदार यांच्या पाहीशी होतो अशी प्रतिक्रिया ओम राजे यांनी दिली . २०१० साली वसंतदादा बँकेने कर्ज वाटप केले होते , तेरणा कारखान्याने चेक वसंतदादा बँकेत पाठवला होता , ते पैसे ज्या ठेकेदार यांनी काम केले होते त्यांच्या खात्यात जमा करा असे सांगितले होते मात्र ते पैसे संबंधित शेतकरी यांच्या नावे जमा न करता सर्व ठेकेदार यांच्या नावाने समसमान जमा केले . बँकेच्या या कृत्याबाबत आर बी ट्रेंडस कडे दाद मागितली व कृत्य चुकीचे असल्याचे ग्राहक मंच व हाय कोर्टात गेलो . कारखाना नेहमी त्यांच्या पाठीशी होता . दुर्दैवाने मृत व्यक्तीच्या नावाने राजकारण केले जात आहे , लवकरच वस्तुस्तिथि बाहेर येईल .

Leave a Comment