काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचा हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांची फसवणूक केली अब्दुल सत्तार यांचा घणाघात

औरंगाबाद  प्रतिनिधी | काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार व माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा दिलाय. आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन सत्तार यांनी आपला हर्षवर्धन पाटील यांना पाठींबा असल्याचं जाहीर केलं. यावेळी मी पाटील यांच्यासाठी मागील १३ महिन्यांपासून सभा घेतल्या.

  ते शिवसेनेचे आमदार असून देखील मी त्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांना गेलो. त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. पाटील हे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते मात्र काँग्रेसने त्यांची फसवणुक केली. आणि आता म्हणुनच मी पाटील यांचा प्रचार करणार असल्याचं सत्तार म्हणाले. दरम्यान सत्तार यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

   काँग्रेसने हर्षवर्धन जाधव यांची फसवणूक केली असल्याचं सत्तार म्हणाले. हर्षवर्धन यांनीे अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मराठा क्रान्ती मोर्चा दरम्यान त्यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला होता. मराठा क्रान्ती मोर्चा दरम्यान सर्वात आधी राजीनामा देणारे तर पहिले आमदार होते. ते भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

वाराणसीत मोदींच्या पराभवासाठी कॉंग्रेसने आखली हि खेळी ?

साताऱ्यात दहशत अन् स्टाईल चालणार नाही ; आदित्य ठाकरेंचा उदयनराजेंना टोला

आंबेडकर- शिंदे यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण

म्हणून झाली सुप्रिया सुळेआणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट

 

Leave a Comment