राजू शेट्टींप्रमाणे मला सरड्यासारखे रंग बदलता येत नाहीत- सदाभाऊ खोत

सांगली । राजू शेट्टींप्रमाणे मला सरड्यासारखे रंग बदलता येत नाहीत, अशा शब्दात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली आहे. तसेच आम्ही फालतू माणसं होतो, पण आमच्यासारख्या फालतू माणसांमुळेच तुमची संघटना मोठी झाली आणि तुम्ही आमदार, खासदार झालात हे विसरलात काय, असा टोलाही खोत यांनी शेट्टी यांना लगावला आहे. इस्लामपूरमध्ये खोत बोलत होते.

दूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलना दरम्यान सोलापूर येथे माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर भंपक आणि फालतू माणसासोबत पुन्हा काम करणार नाही, अशा शब्दात टीका केली होती.

राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेवर खोत म्हणाले की, ठीक आहे, आम्ही फालतू माणसं होतो पण आम्ही फालतू माणसांनी संघटना वाढवली. त्यामुळे तुम्ही आमदार, दोनवेळा खासदार होऊ शकला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नेते बनवून तुम्ही राज्य करू शकला. पण मला त्यांच्यासारखं सरड्यासारखे रंग बदलता येत नाही. मला वाटतं त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचं असेल तर सदाभाऊचं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धीच्या झोतात राहू शकत नाहीत, असे वाटत असेल. त्यामुळेच अशा भंपक माणसाविषयी फार बोलावे, अशी माझी इच्छा नाही. त्यांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा, सदाभाऊच्या विषयावर आवाज उठविण्यासाठी अजून 4 वर्षे बाकी आहेत. 2024 ला आपण आमने-सामने येऊ शकतो आणि एकमेकांना उत्तर देऊ शकतो, असा इशारा खोत यांनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook