मोदींनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर मनसेनं केला ‘हा’ परखड सवाल

मुंबई । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मनसेनं आर्थिक पॅकेजवरून भाजपला टोला हाणला आहे. मनसेच नेते संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. लॉकडाऊनमुळं ठप्प झालेली अर्थव्यवस्थेची … Read more

काल मोदींनी फक्त एक हेडलाइन आणि एक कोर पान दिलं- पी. चिदंबरम

मुंबई । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. लॉकडाउनमुळे खीळ बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल २० लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली. मोदींनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे फक्त एक ‘हेडलाइन आणि … Read more

तर लाईव्ह भाषण करून जनतेला गोंधळात टाकताच कशाला?; प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका

मुंबई । काल देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज … Read more

कोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न जाणं जास्त गरजेचं आहे.

संचारबंदीला तोंड देणाऱ्यासाठी जे काही राबविले गेले आहे त्यामध्ये गरीब आणि उघड्यावर असलेल्या लोकांना तपासून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे. तसेच अन्न वितरण साखळीतील पोकळी भरून काढण्याच्या काळजीसाठी देखील वेळ नाही आहे. धोरण तयार करणाऱ्यांनी त्यांच्याकडे जे आहे ते सर्व करण्याची खूप गरज आहे.

लॉकडाऊनमधील ‘या’ लग्नाने चंद्रकांतदादांना माणसांत आणि जमिनीवर आणलं

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील लॉकडाऊनमध्ये एका साध्या विवाहसोहळ्यास हजेरी लावली.

कोरोना संकटात शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना पत्र

राज्यातील शिक्षकांना कोरोना काळात कराव्या लागणाऱ्या ड्युटी संदर्भात आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भात एमफुक्टो या शिक्षक संघटनेत उपाध्यक्ष पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी पत्र लिहिलं आहे. आपल्या मागण्या त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापुढे मांडल्या आहेत.

नरेंद्र मोदी Live | अब बचना भी हैं, और आगे भी बढना हैं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन संदर्भात देशवासीयांशी संवाद साधला. देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या लॉकडाऊनच्या मध्यात देशवासीयांशी हा संवाद साधला. कोरोना संक्रमणाशी लढताना जगभराने मागील ४ महिने लढा दिला असून जगभरात ४२ लाख लोकांना याचा संसर्ग झाला, ज्यामध्ये पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला. भारतातही यामुळे बऱ्याच … Read more

..म्हणून ऐनवेळी भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी चौथा उमेदवार बदलला

मुंबई । पक्षात नव्यानं सामील झालेल्यांना विधानपरिषद निवडणुकीची उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर होता. ही नाराजी काही प्रमाणात दूर करण्यासाठी भाजपने मागील आठवड्यात अर्ज दाखल केलेले डॉ. अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन काल अर्ज दाखल केलेल्या रमेश कराड यांचा अर्ज कायम ठेवला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी ऐनवेळी चौथा उमेदवार बदलल्यानं रमेश कराड … Read more

डॉ. मनमोहन सिंह यांना रूग्णालयातून मिळाली सुट्टी

नवी दिल्ली । देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर मनमोहन सिंह यांना दोन दिवसापूर्वी अचानक छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. आज मंगळवारी उपचारानंतर मनमोहन सिंह यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप आणि छातीत दुखू लागल्याने 87 वर्षीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रविवारी संध्याकाळी 8 वाजून 45 … Read more

मला काँग्रेसकडून ऑफर होती; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

जळगाव । विधानपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसकडून ऑफर होती आणि भाजपच्या ६-७ आमदारांनीही क्रॉस व्होटिंग करण्याची तयारी दर्शवली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मात्र आपण ही ऑफर नाकारली, असा दावाही खडसे यांनी केला. भाजपनं विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट नाकालल्यानं खडसे सध्या पक्ष नैतृत्वावर तीव्र नाराज आहेत. अशातच आपल्याला … Read more