कोरोना इम्पॅक्ट | स्थानिक स्वराज्य संस्था बळकट झाल्या तरच, केंद्र आणि राज्यातील सत्ता चांगल्या चालतील – मणी शंकर अय्यर

राज्यांनी केंद्र सरकारच्या अंमलबजावणीच्या शस्त्राप्रमाणे नाही पण संघराज्यातील स्वायत्त घटक म्हणून काम केले पाहिजे. तर पंचायतींनीही स्वतःला राज्य सरकारचा विस्तार न समजता “स्वराज्य संस्थेतील” घटक समजले पाहिजे. पंचायतीला संविधानाच्या तीन स्तरीय हस्तांतरणीय  पद्धतीत आणण्याचा विचार केला पाहिजे. केंद्र-राज्य-पंचायत (आणि नगरपालिका).

राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानपरिषदेसाठी ‘या’ दोन नेत्यांची उमेदवारी जाहीर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे तिकीट जाहीर झाले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी ट्वीट करत उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी अनेकदा जाहीर सभेत कौतुक केले … Read more

पडळकरांची लढाई ही स्वत:च्या आमदारकीच्या सर्टिफिकेटसाठी होती, धनगर समाजासाठी नव्हती!

सांगली । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्यापुर्वी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी जाहीर आश्वासने दिली होती. नंतरच्या काळात ती पुर्ण न केल्यामुळे फडणवीस यांच्या विरोधात समाजात असंतोष तयार झाला होता. तो कमी करण्यासाठी फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना ‘आरक्षण आंदोलन’ उभे करायला लावून आपला कार्यभाग साधला. पडळकरांना वंचित आघाडीत पाठवून पुन्हा … Read more

विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच? काँग्रेसनं उतरवला पहिला उमेदवार मैदानात, २ जागांसाठी आग्रही

मुंबई । विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस दुसरा उमेदवार लवकरच जाहीर करेल, असं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. काँग्रेस २ जागांवर ठाम असल्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार नाहीत, असंच चित्र सध्या दिसत आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने ४ उमेदवार रिंगणात … Read more

औरंगाबादच्या घटनेनंतर पवारांनी लावला थेट रेल्वे मंत्र्यांना फोन, केली ‘ही’ मागणी

मुंबई । औरंगाबाद येथे मजुरांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर या मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. पवारांनी थेट रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना फोन करून या मजुरांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे. आपण याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीने सांगली भाजपात नाराजी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चारजणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिल्ह्यातील व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांचा समावेश आहे. विधानपरिषदेसाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे आणि निता केळकर, दीपकबाबा शिंदे हे निष्ठावंत इच्छुक होते. यंदा निष्ठावंतांना संधी मिळेल याची खात्री असताना पक्षाकडून तिघांनाही डावलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंड करीत … Read more

आपल्या मृत्यूच्या बातमीवर अमित शहा म्हणतात…

नवी दिल्ली । काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहयांच्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अशावेळी अमित शाह यांनी या अफवांचे खंडन करत आपण ठीक असल्याचे सांगितलं. अमित शहा यांनी शनिवारी ट्विटवरुन आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन केलं आहे. ट्विटवरुन त्यांनी एक निवेदन पोस्ट केलं … Read more

..अन्यथा गृहमंत्री शहांनी ममता दीदींची माफी मागावी- तृणमूल काँग्रेस

कोलकाता । गृहमंत्री अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून, स्थलांतरीत मुजरांना आपल्या घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य प्राप्त होत नसल्याची तक्रार केली होती, यावर तृणमूल काँग्रेसकडून जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आलं. अमित शहांनी केलेले खोटे आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी, असा तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा पलटवार केला आहे. तृणमूलचे … Read more

केंद्राची घोषणा! राम मंदिरासाठी दान देणाऱ्यांना आयकरात सूट

नवी दिल्ली । अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी दान देणाऱ्यांना यापुढे आयकरात विशेष सूट मिळू शकणार आहे. केंद्र सरकारनं एक नोटिफिकेशन काढून तशी घोषणाच केली. देशात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणा दरम्यान अर्थ मंत्रालायाकडून हा एक नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार, राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना … Read more

रामदास आठवलेंचा अपेक्षाभंग! मित्रपक्ष भाजपाने एकही तिकीट न दिल्यानं केलं नाराजीचं ट्विट

मुंबई । राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीत भाजपने ४ पैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली होती. त्यावर विचार करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं आठवले यांनी सांगितलं होतं. मात्र, भाजपने चारही जागांवर … Read more