शरद पवारांमुळे अनिल बाबरांचे मंत्रिपद हुकले?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्याच्या मंत्रिमंडळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पगडा असून त्यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेनेही आपले मंत्री ठरविल्यामुळे शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे. शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आलेली नाहीत यामुळेच खानापूर-आटपाडीचे आ.अनिल बाबर यांचे मंत्रिपद हुकल्याचे विश्‍वासनीय वृत्त आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या … Read more

अब्दुल सत्तारांना ग्रामविकास तर बच्चू कडूंना शालेय शिक्षण व कामगार; पहा संपूर्ण खातेवाटप

मुंबई | कृषी खाते कोणाकडे जाणार यावरून काँग्रेस व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर कृषी खाते शिवसेनेकडे गेले आणि शिवसेनेचे दादा भुसे कृषी मंत्री झाले. खाते वाटपा संबंधी अधिकृत घोषणा झाली नसली तरी सूत्रांकडून मिळालेली यादी अंतिम मानली जात आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांना कोणते खाते मिळाले हे अद्याप स्पष्ट झाले नसले … Read more

मंत्रिपदाच आमिष दाखवलं तरी माझी नाराजी कायम – एकनाथ खडसे

टीम हॅलो महाराष्ट्र : भाजप नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाली. पण ही भेट फक्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीपुरती मर्यादित होती असे स्पष्ट करत मला आमदारकीच किंवा मंत्रिपदाच आमिष दाखवलं तरी हा विषय मी सोडून देणार नाही, माझी नाराजी कायम आहे असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना … Read more

माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याच वृत्त फेटाळलं

औरंगाबाद | माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्या आहेत असे बोलून स्वतः राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याच वृत्त फेटाळून लावली आहे. सत्तार म्हणाले की, तुम्हाला ज्यांनी मी राजीनामा दिला असं सांगितलं त्यांना विचारून घ्या की मी राजीनामा दिला की नाही दिला. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. अब्दुल सत्तार लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. … Read more

काँग्रेसचा ‘हा’ आमदार आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार? महाविकासआघाडीतील नाराजी नाट्य शिगेला

जालना | आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची बातमी ताजी असतानाच आता महाविकास आघाडीला अजून एक झटका बसला आहे. काँग्रेसचे आमदार कैलाश गोरंट्याल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नाही तर ते पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे ते राजीनामा सोपवतील. “हम वफा कर के … Read more

राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही; पंकजा मुंडेंनी पराभव स्वीकारला

बीड | जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. यापूर्वीच पंकजा मुंडे यांनी ट्विट करून या निवडणुकीवर भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी म्हंटले की, राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे. रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत. … Read more

राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप – मनसे युती?

पालघर प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राज ठाकरे आणि नरेंन्द्र मोदी एकाच बॅनरवर दिसल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. लाव रे तो व्हिडिओ च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींविरोधात रान पेटवले … Read more

यशोमती ठाकूर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री ?? जिल्ह्यात जोरदार बॅनरबाजी

खरंच यशोमती ठाकूर यांना महिला आणि बालकल्याण खातं मिळालं आहे? बॅनरबाजी कितपत खरी?

अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा, शिवसेना नेत्याचे स्पष्टीकरण

औरंगाबाद प्रतिनिधी | शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या. हे वृत्त समजल्यानंतर सत्तारांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर प्रयत्नशील होते. यावेळी अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा असल्याचे सांगत खोतकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सत्तार यांना भेटण्यासाठी ते हॉटेल अतिथीमध्ये गेले असता वेगळ्याच गोष्टी … Read more

लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला, अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

पुणे प्रतिनिधी | आता अशा बातम्या येत राहतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर भाजपमधील नेते अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून शिवसेनेवर तोंडसुख घेत आहेत. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे. यावेळी तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही … Read more