देशातील सर्वजण हिंदू आहेत असे म्हणणे अयोग्य – रामदास आठवले

एक काळ असा होता की आपल्या देशात प्रत्येकजण बौद्ध होता. हिंदू धर्म आला की आम्ही हिंदू राष्ट्र बनलो. जर त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकजण आपला आहे तर ते चांगले आहे.

देशामध्ये अराजकता माजवण्याचा RSS, भाजपचा कट – प्रकाश आंबेडकर

मुंबई : NRC, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि NPR च्या माध्यमातून देशामध्ये अराजकता माजवण्याचा कट RSS, भाजपच्या सरकारने रचला असल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीने नागरिकत्व दुरुस्ती कायदा व NRC च्या विरोधात दादरमध्ये मोर्चाचे आयोजन केले होते. तेव्हा झालेल्या सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या … Read more

एनआरसी आणि सीएए कायद्याच्या समर्थनात भाजपची स्वाक्षरी मोहीम

परभणीमध्ये केंद्र सरकारने आणलेल्या या कायद्याच्या समर्थनासाठी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या करून एक लाख स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे.

देशात राहणारे १३० कोटी लोक हिंदूच – मोहन भागवत

देशात राहणारे १३० कोटी लोक हिंदूच असल्याचं म्हटलं आहे. धर्म आणि संस्कृतीची पर्वा न करता जो राष्ट्रप्रेमाला सर्वाधिक महत्व देतो तो हिंदूच असल्याचं वक्तव्य मोहन भागवत यांनी नुकतंच केलं आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात मला जाणून बुजून गोवले, संभाजी भिडेंची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका

प्रथमेश गोंधळे, सांगली – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भीमा कोरेगाव प्रकरणावर भाष्य केले. भीमा कोरेगाव प्रकरणी माझा कोणताही संबंध नाही. त्यादिवशी मी इस्लामपूर मध्ये मंत्री जयंत पाटील यांच्या सांत्वनासाठी गेलो होतो, या प्रकरणात निष्कारण मला गोवले आहे. या मागे दुष्टबुद्धी बारामती की तेरामतीची आहे हे मला माहित नाही,या भाषेत त्यांनी शरद … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची धडप; मोर्चेबांधणीला सुरुवात

राज्यात नव्या आघाडीमुळे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणे बदलायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखण्यात येत आहे.

महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही मुख्यमंत्री ‘धनुष्यबाणाचा’च

झारखंड | झारखंड विधानसभेचा निकाल आज लागला. येथे झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने आघाडी घेतली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. हेमंत सोरेन यांनी लालूप्रसाद यादव आणि कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. तसेच, झारखंडच्या आदिवासी गरीब जनतेने भाजपला नाकरल्याची प्रतिक्रिया सोरेन यांनी दिली आहे. 2019 मध्ये भाजपने … Read more

…म्हणून कोणी ‘ठाकरे’ होत नाही; अमृता फडणवीस

मुंबई | माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली … Read more

…म्हणून मी संघ सोडून शिवसैनिक झालो : शरद पोंक्षे

कल्याण | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून बाळासाहेबांचा शिवसैनिक होण्याचे कारण सांगताना अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दंड चालवायला शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात. म्हणून आपल्याला ते पटत नाही. कल्याणमध्ये अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदुत्वाविषयी बोलताना पोंक्षे म्हणाले, “मराठी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे, असे म्हटल्याने … Read more

मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचं पारड जड; शिवसेनेकडील गृह खाते राष्ट्रवादीकडे?

गृह खाते आपल्याकडेच राहावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याचेही बोलले जात आहे. परंतु बार्गेनिंगमध्ये शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री पद जरी शिवसेनेकडे असलं तरी उपमुख्यामंत्री पदासह महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहेत.