मुंबई | मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रामधून पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राज यांनी व्यंगचित्र काढून मोदी हे स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेले प्रसिद्धी विनायक असल्याचे म्हटले आहे.
शाळांमध्ये मुलांना नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित ”चलो जीते है” हा लघुपट दाखवण्याची जबदस्ती करण्याच्या या निर्णयावर राज ठाकरे यांनी मोदींना घेरले आहे. मोदींनी काल आपला ६८ वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान राज ठाकरेंनी व्यंगचित्राद्वारे मोदींना स्वत:च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक म्हणून संबोधले आहे. या चित्रात राज ठाकरे यांनी गणपतीच्या रूपात मोदींना दाखवले असून खाली उंदीर म्हणून अमित शहांचीही खिल्ली उडवली आहे. विशेष म्हणजे त्या गणपतीला मोदी स्वत: ओवाळत आहेत. यावेळी बाजूला अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह ही नेहमीची मंडळीही उपस्थित आहे.
या चित्रात गणेशमूर्तीत दाखवलेल्या नरेंद्र मोदी यांच्या चार हातात वेगवेगळ्या वस्तू दाखवण्यात आल्या आहे . त्यापैकी एका हातात वर्तमान पत्रे , दुसऱ्या हातात काही मीडिया प्रतिनिधींचे कॅमेरे , तिसऱ्या हातात पक्षनिधीसाठी पावती पुस्तक तर चौथ्या हातात ईव्हीएम मशिन आहे . या चारही बाबींचा मोदींकडून होत असलेला दुरुपयोग होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे
#NarendraModi #AmitShah #PublicityHungry pic.twitter.com/90GMJHxfUo
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2018