सांगलीत संजय पाटील अडचणीत, उमेदवारास पक्षाच्याच आमदारांचा विरोध 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्मिता पाटील, गोपीचंद पडाळकर आणि स्वाभिमानी शड्डू ठोकून तयार

सांगली प्रतिनिधी | भाजप खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपच्या सर्व आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाटील यांच्याविषयीच्या तक्रारींचा पाऊस पडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हैराण झाले. या बैठकीला खासदार संजय पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, लोकसभा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, सांगली लोकसभा संयोजक शेखर इनामदार आदी उपस्थित होते.

बैठकीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या रणनीतीविषयी चर्चा सुरू असताना, उमेदवारीवरून बहुतांश पदाधिकारी व सर्व आमदारांनी आक्षेप नोंदविले. उमेदवारी बदलून दिल्यास भाजपमधील नाराजी दूर होऊन भाजपची ही जागा विक्रमी मताधिक्याने निवडून येऊ शकते, अशी खात्रीही व्यक्त करण्यात आली.

दरम्यान काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सांगलीच्या जागेवरून वाद सुरु झाला असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या जागेवरून आर.आर.पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. याशिवाय धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडाळकर यांनीदेखील आपण सांगलीतून निवडणूक लढवणार असल्याचे सूतोवाच दिल्याने या जागेवर चांगलीच राजकीय धुमश्चक्री येत्या कालावधीत पहायला मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

रणजितसिंहांचे भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबविली…

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

बैलाच्या मृत्यूने कुटुंबीय हेलावले ; लाडक्या राजाचा दशक्रिया विधी सर्वत्र चर्चेत

वसंतदादा घराण्याला संपविण्याचा प्रयत्न, विशाल पाटीलांचा जयंत पाटीलांवर हल्लाबोल

रणजीतसिंह मोहिते पाटिलांनंतर राष्ट्रवादीच्या या माजी खासदाराच्या मुलाचा भाजप प्रवेश