म्हणून सैराटमधील तो कलाकार माढ्यात करू शकला नाही मतदान

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माढा प्रतिनिधी | सैराट चित्रपटातील कलाकार तानाजी गळगुंडे याला आपला मतदानाचा हक्क बजावता आला  नाही. माढा तालुक्यातील बेंबळे या गावचा मूळ रहिवासी असणारा तानाजी मतदानासाठी गावात आला मात्र त्याला मतदान करता आले नाही. कारण त्याचे मतदार यादीत नावच नव्हते.

मतदार म्हणून नावनोंदणी करण्यासाठी तानाजीने आवश्यक अर्ज भरून त्याला सर्व कागदपत्रे देखील जोडून दिली होती. त्याला नाव नोंदणी संदर्भात तहसीलदार कार्यालयातून दोन वेळा फोन देखील आला होता. मात्र त्याच्या नावाची नोंद मात्र मतदार यादीत झाली नाही. त्यामुळे त्याला मतदान नकरताच माघारी जावे लागले.

मतदार नोंदणीसाठी तहसीलदार कार्यालयातून  दोन वेळा फोन आला होता म्हणून तानाजीने आपले मतदार यादीत नाव निश्चित असल्याचे मानून थेट आपले गाव बेंबळे गाठले. मात्र इथ आल्यावर त्याला  मतदार यादीत स्व:ताचे नाव पाहण्यास मिळाले नाही. त्यामुळे त्याला  मतदानापासून वंचित रहावे लागले आहे.