सध्याच्या राज्य सरकारमधील एका मोठ्या व्यक्तीनंचं दाभोलकर प्रकरण दाबलंय!- प्रकाश आंबेडकर

मुंबई । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ‘सध्या महाराष्ट्रात असलेल्या सरकारमधील एका मोठ्या व्यक्तीनंच दाभोलकर प्रकरण दाबलं आहे,’ असा दावा आंबेडकरांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी दाभोलकर प्रकरणावर एका मागोमाग एक ट्वीट करत खळबळजनक दावा केलाय.

यावेळी आंबेडकरांनी राज्यात सध्या असलेल्या सरकारमधील एका व्यक्तीवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘आज नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला ७ वर्ष पूर्ण होताहेत. आरोपींचा आणि त्या कटाच्या मास्टरमाईंडचा अजूनही शोध लागलेला नाही, तो लागणारही नाही. राज्यात सेक्युलर सरकार आलंय असं म्हणतात. पण, आम्हाला शंका आहे की, या सेक्युलर सरकारमधीलच एका मोठ्या व्यक्तीनं हे प्रकरण त्याचवेळी दाबले होते.’

दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी समस्त पुरोगामी मंडळींना आवाहन केलं आहे. ‘ही लढाई न्यायालयीन नसून राजकीय आहे, तेव्हा त्यापासून तुम्हाला पळता येणार नाही. इथल्या संत परंपरेविरुद्ध वैदिक परंपरेचे हे राजकीय युद्ध आहे. या युध्दातले खरे मित्र आणि खरे शत्रू ओळखून निराश न होता, न घाबरता हे आंदोलन चालू ठेवण्याची गरज आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook