कराड | विद्यार्थ्यांच्या यशाने शाळा व शिक्षकांचे नाव मोठे होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद शिक्षका एवढा कोणालाही होत नाही. आपल्या विद्यार्थ्यांनी नवनवीन क्षेत्रात यशस्वी व्हावे, यासाठी प्रत्येक शिक्षक प्रयत्नशील असतो, असे प्रतिपादन दक्षिण तांबवे शाळेचे मुख्याध्यापक आबासो साठे यांनी केले.
तांबवे (ता. कराड) येथील पूजा दिपक पाटील हिने बीडीएस परिक्षेत यश मिळवल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. दक्षिण तांबवे जिल्हा परिषद शाळेची पहिली विद्यार्थिनी डाॅक्टर झाल्याने तिचा सत्कार शाळेने केला. यावेळी आबासो साठे बोलत होते. यावेळी सतिश सोनवणे, सौ. मनिषा साठे, सौ. सीमा देसाई, सौ. रंजना मोगरे, कु. निकिता जाधव आदी उपस्थित होते. तिच्या यशाबद्दल कोयनाकाठ ग्रुपनेही तिचा सत्कार केला. यावेळी अनिल बाबर, मंगेश पाटील, सागर पवार, विक्रम पाटील, वैभव डोंगरे, अण्णासो पाटील, अमृता पोतदार, जगदीश पोतदार यांच्यासह पूजा कुटुंबिय उपस्थित होते.
यावेळी पूजा पाटील म्हणाल्या, माझ्या या यशात मला अनेकांनी शुभेच्छा दिल्या, सत्कार केला. परंतु माझ्या शाळेने केलेला सत्कार माझ्यासाठी विशेष आहे. या सत्काराला उत्तर द्यायला मला शब्दच नाहीत. कारण जिथून सुरूवात झाली, तिथेच माझा सन्मान झाला ही बाब खूप मोठी आहे.
जिल्हा परिषद दक्षिण तांबवे ते डाॅ. पूजा पाटील
पूजा पाटील हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा दक्षिण तांबवे येथे झाले. पुढे स्व. अण्णा बाळा पाटील विद्यालय तांबवे व विठामाता हायस्कूल कराड येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तर वारणानगर येथील बीडीएसचे शिक्षण पूर्ण केले.