Monday, March 20, 2023

कोयना धरणाचे दरवाजे चाैथ्यांदा उघडले : परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयना धरण क्षेत्रात काल सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आज सकाळी 8 वाजता धरणातून 2 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून 3 हजार 154 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या धरणात 104.90 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. तर पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. चालू वर्षात कोयना धरण व्यवस्थापनाने पाण्याचे नियोजन करण्यासाठी चाैथ्यांदा धरणाचे दरवाजे उचलले आहेत.

सध्या पावसाचा जोर मंदावला असला तरी परतीच्या पावसाने काल दुपार नंतर जिल्ह्यात मुसळधार हजेरी लावली. कोयना व कृष्णा नदीपात्राच्या पाणी पातळीत घट झालेली आहे.  परंतु पावसाचा जोर मंदावल्याने नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाली आहे. परंतु परतीच्या पावसाने धरणक्षेत्रात चांगलीच हजेरी लावली. आजही सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली गेली आहे.

- Advertisement -

कोयना धरण पायथा विद्युत गृहामधून 1050 क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 4 हजार 204 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापनाने केले आहे. सध्या कोयना 26 मिमी, नवजा 76 मिमी व महाबळेश्वर 62 मिमी पावसाची नोंद झाली आहे.