हॅलो महाराष्ट्र । आदर्श गाव हिवरे बाजार गावाचे माजी सरपंच पोपटराव पवारांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी गावाचा कायापालट केल्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आदर्श सरपंच पोपटराव पवार, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि सिड बँकच्या राही पोरे या महाराष्ट्रातील तीन कर्तृत्वान मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
पोपटराव पवार यांची जलसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी
अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार हे गाव तसं दुष्काळी भागात येणारं. १९७२च्या दुष्काळानंतर ज्वारी आणि बाजरी हीच हिवरे बाजार गावातली मुख्य पिके झाली. ९५ टक्के लोक दारिद्य्र रेषेच्या खाली गेले. गावात पावसाचे प्रमाण २०० ते ४०० मिलीमीटर असूनही गावातले लोक ४ महिन्यांसाठी स्थलांतर करू लागले. गावात सावकाराचे राज्य आले. कालांतराने दुधाची जागा दारुने घेतली. दारुने गावात धिंगाणा आणि मारामाऱ्या आणल्या. दारूमुळे गावात चोऱ्या होऊ लागल्या.
त्यानंतर १९८९ पासून हिवरे बाजार हे गाव सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रयत्नांमुळे सुधारू लागले. ९० ते ९५% ग्रामविकासाचा आराखडा तयार झाला. जलसंधारणाचे नियोजन करून गावात पहिले पाणी आले. समपातळी चर खणून कुरण विकास झाला, रोजगार मिळाला आणि पाणीही मिळाले.
लोकसहभागाच्या आणि सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम झाल्याने हिवरे बाजार हे गाव दुष्काळमुक्त झाले. या उल्लेखनीय कामासाठी ग्रामपंचायतीस २००९ चा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार जाहीर झाला.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा
हे पण वाचा-
ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ जाहीर
आजपासून सामना बंद म्हणजे बंद; मनसेची आक्रमक मोहीम
कोल्हापूरात नाभिक समाजाचा अनोखा उपक्रम; प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे मोफत कापले केस