Sunday, April 2, 2023

रणवीरच्या कपड्यांमुळे नेटिझन्सनी उडवली त्याची चांगलीच खिल्ली; फोटो व्हायरल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र । रणवीर सिंग त्याच्या अतरंगी ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असतो. इंस्टाग्रामवर आपले वेगवेगळ्या पोषाखातले फोटो रणवीर नेहमीच शेयर करत असतो. त्याच्या या फोटोंवर फॅन्सकडून नेहमीच त्याचे कौतुक होत. असाच एका फोटो रणवीरने नुकताच इंस्टाग्राम पोस्ट केला आहे. मात्र, हा फोटो पाहून त्याच्या फॅन्सनी रणवीरला चांगलंच ट्रोल केलं तर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट करत त्याच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक केलं आहे.


View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on Jan 24, 2020 at 8:17pm PST

या फोटोत त्याने काळ्या रंगाचा पोल्का डॉटचा शर्ट घातला असून त्यावर स्ट्रीप्सची अतरंगी पँट घातली आहे. तसेच पोल्का डॉटची कॅप घातली आहे. तसेच यावर पिंक रंगाचे शूज देखील घातले आहेत. रणवीरच्या या खतरनाक लूकची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. त्याने घातलेल्या कपड्यांमुळे नेटिझन्स त्याची चांगलीच खिल्ली उडवत आहेत. काही युझरनी त्याला चक्क जोकर म्हटले आहे तर काहींनी दीपिकाचे कपडे घालून आलास का असे विचारले आहे. असाच ड्रेस दीपिकाने ओम शांती ओममध्ये घातला होता अशी आठवण देखील नेटिझन्सने रणवीरला करून दिली आहे.

- Advertisement -


View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on Jan 24, 2020 at 8:17pm PST

 

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

आमच्या नादाला लागू नका, महागात पडेल; मनसेचे नेते बाळा नांदगावकरांचा इम्तियाज जलील यांना इशारा

आमच्या नादाला लागू नका, महागात पडेल; मनसेचे नेते बाळा नांदगावकरांचा इम्तियाज जलील यांना इशारा