पॉर्नचा विषय चित्रा वाघांच्या अंगलट आलाच… कसे ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉर्न असा किळसवाणा प्रकार आणला जातोय, त्याबद्दल आम्हाला उद्धव ठाकरेंना जाब विचारायचा आहे…लोकसभेच्या प्रचारादरम्यान विरोधकांना टार्गेट करण्यासाठी भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी काढलेलं हे आगळ वेगळ हत्यार. विषय होता, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीचा. महिला अत्याचार या विषयावर तयार करण्यात आलेल्या या जाहिरातीत एका पॉर्नस्टारने काम केल्याने वाघ यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या पॉर्नचा उल्लेख करत उद्धव, आदित्य, शिवसेना आणि संस्कृती या सगळ्यांचा उद्धार त्यांनी केला. आता यावर शांत बसतील त्या सुषमा अंधारे कसल्या…

सध्या वाघ दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत. माझ याच ज्ञान कमी आहे, चित्रा वाघ यांचं पॉर्न व्हिडिओचं ज्ञान अगाध असावं किंवा त्या पारंगत असाव्यात. असं म्हणत अंधारे यांनी बॉम्ब टाकला. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर 3000 हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवण्णा, किंवा मुलुंडच्या HD व्हिडिओ वाल्याबद्दल चित्रा वाघ आळीमिळी गुपचिळी का करून बसल्या आहेत? असा तिखट प्रश्नही त्यांनी विचारला. चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी उकरून काढलेला हा पॉर्नचा विषय आता मात्र त्यांच्याच अंगलट आलाय. चित्रा वाघ यांनी निशाणा मशालीवर धरला पण नेम कमळावर लागला. अशी परिस्थिती निर्माण झाली. या एका विषयापाई चित्रा वाघ यांना तुरुंगाची हवा देखील मिळू शकते. राजकारणात हा पॉर्नचा विषय का तापलाय? यामुळे चित्रा वाघ आणि भाजप कशी तावडीत सापडलीय? हेच विस्तारानं समजून घेऊया…

पॉर्न फिल्मवरुन Chitra Wagh आणि Sushma Andhare यांच्यात जुंपली.

मुळात हा सगळा विषय सुरू झाला तो चित्रा वाघ यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेमधून. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महिला अत्याचाराच्या संबंधी एक जाहिरात प्रसिद्ध केलीय. या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू ॲप मधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे शोषण करतो. अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली? असा सवाल उपस्थित करत वाघ यांनी नव्या वादाला तोंड फोडलं….वाघ एवढ्यावरच थांबल्या नाहीत. तर त्यांनी पॉर्न आणि ठाकरे कुटुंब यांचं कनेक्शनही जोडण्याचा प्रयत्न केला. आदूबाळने याआधीच नाईट लाईफसाठी आग्रह धरला होता. एक पॉर्न स्टार उबाठाच्या जाहिरातीमध्ये झळकतो. त्यांना जाहिरातीसाठी इतर कलाकार मिळाला नाही का? ही जाहिरात कंपनी आणि उद्धव ठाकरेंचा काय संबंध? हे लहान वयाच्या मुलींसाह अश्लील चित्रीककरण घाणेरडं कृत्य करतानाचे व्हिडीओ, क्लिप्स आहेत. हा सगळा प्रकार पाहून एक महिला म्हणून माझी मान शरमेने खाली गेली. थोडक्यात चित्रा वाघ यांनी एका जाहिरातीवरून पक्षाच्या चारित्र्यावरच शंका घेतली. पण गेम खरा इथेच उलटला…

चित्रा वाघ यांनी पोर्नचा मुद्दा मैदानात आणला तर त्याच्या विरोधात शिवसेनेनं सेक्स स्कँडलला हवा देऊन भाजपने झाकलेला मुद्दा वर काढला. गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही. तर चित्रा वाघ यांनी भर पत्रकार परिषदेत दाखवलेल्या आणि पोर्न स्टार असा उल्लेख केलेल्या व्यक्तीनं चित्रा वाघ यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याची भाषा देखील केली आहे…त्याचं झालं असं चित्रा वाघ यांच्या आरोपांवर शिवसेनेचे नेते तुटून पडले. आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. या बाई 3000 हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवण्णा व मुलुंडच्या HD व्हिडिओ वाल्यावर काहीच बोलत नाहीत. असं म्हणून अंधारे यांनी प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडलवरुन भाजपला घेरलं.

जो पॉर्न उमेदवार तुम्ही उभा केला, ज्याने हजारो महिलांचं शोषण केलं, घरात काम करणाऱ्या महिलांनाही ज्यांनी सोडलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही याबाबत का विचारत नाहीत. मोदींनी प्रज्वल रेवण्णाच्या बाबातीत का विधान केलं नाही. 2500 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लीप समोर आले आहेत, जो भाजपासोबत येऊन ही लढाई लढत आहे, त्याच व्यक्तीकडून हे व्हिडिओ मिळाले आहेत. त्याला पळवून लावण्याचं काम तुम्ही केलंय, तो फ्रान्समध्ये मजा मारत फिरतोय आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात. जरा तरी लाज वाटू द्या, पाण्यात बुडून मरा, अशा संतापजनक शब्दात प्रियांका चतुर्वेदी यांनीही चित्रा वाघ यांचा समाचार घेतला आहे. थोडक्यात कर्नाटकात निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा झालेल्या प्रज्वल रेवण्णा प्रकरणाला चित्रा वाघ यांनीच नकळतपणे महाराष्ट्रात तोंड फोडून दिलं आणि भाजपची अडचण करून घेतली. चित्रा वाघ यांच्या आरोपांचा बूमरँग फक्त पक्षावरच झाला नाही तर त्यांनाही याची झळ सोसावी लागतेय…

चित्रा वाघ यांनी त्यांनी ज्याला पॉर्न स्टार म्हटले तो अभिनेता आता भडकला असून त्याने चित्रा वाघ यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या “वॉर रुकवादी पापा” जाहिरातीतील अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी हे चित्रा वाघ यांच्या आरोपांमुळे संतापले असून त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा देखील केली. त्यांनी या सगळ्यावर मौन सोडत आपली हळवी बाजूही मांडली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो हे त्यांना माहीत असावे . आज त्यांनी माझ्या एका वेबसिरीजच्या भूमेकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याची मी निंदा करतो आणि माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा देऊन माझी अब्रू नुकसानी केल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेतो. त्यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मी अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करेन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीत मी काम केले आहे त्यामुळे त्या जाहिराती करणारा कलावंत पॉर्न स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला. जे फोटो त्यांनी प्रेस कॉन्फरेन्स मध्ये दाखवले ते माझ्या एका वेब सिरीज मधले आहेत आणि ते त्या भूमिकेचा एक भाग होता. चित्रा वाघ यांनी विनाकारण माझ्या प्रतिमेला मलीन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागला आहे. केवळ आपल्या राजकीय स्वार्था साठी त्यांनी माझी प्रतिमा मलीन केली आहे…

अशा कडक शब्दात त्यांनी चित्रा वाघ यांच्या अडचणी आता वाढवल्या आहेत. त्यामुळे आता प्रकरण अंगलट आल्याने चित्रा वाघ अभिनेते प्यारेलाल यांची माफी मागून मिटवत घेण्याचा प्रयत्न करतील. की या विषयाला आणखीन हवा मिळेल. हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे…एकूणच पोर्न हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात चित्र विचित्र पद्धतीने जघळला जातोय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नक्की सांगा.