औरंगाबाद | विवाह झाल्यानंतरही प्रियकरासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचे अश्लिल फोटो पतीच्या मोबाईलमध्ये काढले. मोबाईलमधून डिलीट केलेले फोटो पतीने पुन्हा रिकव्हर केले. हेच फोटो पती व दिराने पत्नीच्या मामासह इतर नातेवाईकांच्या मोबाईलवर व्हायरल केले. याचा राग आल्यामुळे विवाहितेने पती, दिरावर फोटो व्हायरल तर प्रियकरावर थेट अत्याचाराचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत पोलिसांना आत्महत्येची धमकी दिली.
या किचकट प्रकरणामुळे पोलिसांना अक्षरश: मन:स्ताप सहन करावा लागला. अखेर चार पोलीस ठाणे फिरल्यानंतर एका ठाण्यात फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांतीचौक परिसरातील एका २० वर्षीय विवाहितेचे गेल्या दोन ते तीन वर्षापासून एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. असे असतानाही तिने सेव्हन हिल भागातील एका तरुणासोबत विवाह केला. विवाहानंतर पतीच्या माघारी ही विवाहिता प्रियकरासोबत शारिरीक संबंध ठेऊ लागली.
एके दिवशी ती चक्क पतीचा मोबाईल घेऊन प्रियकरासोबत फिरायला गेली. त्यावेळी तिने प्रियकरासोबत मोबाईलमध्ये फोटोसेशन केले. तेथून परतल्यानंतर तिने मोबाईलमधील फोटो डिलीट केले. त्यानंतर पुन्हा पतीचा मोबाईल घेऊन ती खुलताबादला गेली. तेथे प्रियकरासोबत अश्लिल फोटो काढून तेही डिलीट केले. पण पत्नीच्या कृत्याची भनक पतीला लागली. त्यामुळे त्याने मोबाईलमधून डिलीट केलेले सगळे फोटो रिकव्हर केले.
फोटो पाहून पतीला धक्काच बसला. त्याने पत्नीचे हे अश्लिल फोटो थेट तिच्या मामासह इतर नातेवाईकांच्या मोबाईलवर व्हायरल केले. फोटो व्हायरल झाल्यामुळे आपली समाजात बदनामी झाली. असे म्हणत विवाहितेने पतीशी वाद घालून ती माहेरी निघून गेली. त्यानंतर तक्रारदार विवाहितेन फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पुंडलिकनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’