Post Office Best Schemes | सगळेच लोक आपल्या भविष्यासाठी काही ना काही बचत करत असतात. त्याचप्रमाणे बाजारात देखील पैशांची बचत करण्याच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. परंतु हे पैसे नक्की कुठे गुंतवावेत? आणि पैसे किती सुरक्षित आहेत? त्यातून किती परतावा मिळेल? या सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच पैसे गुंतवणे फायदेशीर होते. नाहीतर अनेक लोकांचे आजकाल पैसे बुडत आहेत. परंतु पोस्ट ऑफिस ही एक विश्वासाहार्य योजना आहे. यामध्ये अनेक लोक गुंतवणूक करतात. या योजनेमध्ये देखील जास्त व्याज मिळते. त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये पैसे सुरक्षित असतात. आता आपण पोस्ट ऑफिसच्या काही योजना (Post Office Best Schemes) पाहूया त्यातून चांगला परतावा मिळेल.
किसान विकास पत्र | Post Office Best Schemes
या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली, तर तुम्हाला 7.5% दराने व्याज मिळेल. तुम्ही 9 वर्ष आणि 7 महिन्यांसाठी यामध्ये पैसे भरले, तर तुम्हाला यामध्ये गुंतवणुकीच्या काही अटी आहेत. या योजनेमध्ये 1 हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येणार नाही.
राष्ट्रीय बचत वेळ ठेव खाते
या योजनेअंतर्गत (Post Office Best Schemes) 1 वर्षासाठी 6.9% दराने दोन वर्षासाठी 7 टक्के दराने 3 वर्षे यासाठी 7.1% दराने आणि 5 वर्षासाठी 7.5% दराने पैसे गुंतवले जाऊ शकते. यामध्ये देखील किमान मर्यादा 1000 आहे, तर कमाल मर्यादा तुम्ही कितीही पैसे घेऊन ठेवू शकता. तुम्ही तरी या योजनेतून 1 वर्षांपूर्वी पैसे काढले, तर तुम्हाला बचत खात्यावर जेवढे व्याज मिळते तेवढेच व्याज मिळेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेली आहे. या योजनेमध्ये वार्षिक 8.2% दराने व्याज मिळते. मात्र हे व्याज 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळणार आहे. हे खाते एक वर्षासाठी जर बंद केले, तर व्याज दिले जाणार नाही. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराची किमान 60 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
ही योजना 5 वर्षात मॅच्युर होते. यामध्ये तुम्हाला वार्षिक 7.60% दराने व्याज मिळते. या योजनेमध्ये तुम्ही 1000 रुपये पासून सुरुवात करू शकता, तर कमाल रकमेवर मर्यादा नाही.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची भारतीय व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकतो. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना हे खाते त्यांच्या पालकांकडे उघडावे लागेल. या मध्ये 7.1% दराने व्याज मिळते ही योजना 15 वर्षात म्हैसूर होते तुम्ही या योजनेमध्ये कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेतून तुम्हाला 1 वर्षाच्या कालावधीनंतर कर्ज देखील घेता येते.