पोस्ट ऑफिस देत आहे बंपर कमाईची संधी, गुंतवावे लागतील फक्त 5,000 रुपये; किती नफा होईल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्हीही कमी पैशात व्यवसाय (Business opporotunity) सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्हाला फक्त 5,000 रुपये गुंतवून भरपू कमाई करू शकाल. होय, पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी घेऊन तुम्ही चांगले पैसे कमावू शकाल. सध्या देशात सुमारे 1.55 लाख पोस्ट ऑफिसेस आहेत. यानंतरही पोस्ट ऑफिसची पोहोच सर्वत्र झालेली नाही. हे लक्षात घेऊन फ्रँचायझी दिली जात आहे. आपण फ्रँचायझी कशी घेऊ शकता ते जाणून घेउयात –

कमाई कशी होते ?
पोस्ट ऑफिस फ्रँचायझींकडून कमाई कमिशनवर होते. यासाठी पोस्ट ऑफिसमधून मिळणारे प्रोडक्ट आणि सर्व्हिस दिल्या जातात. या सर्व सर्व्हिसेसवर कमिशन दिले जाते. MOU मध्ये अगोदरच कमिशन ठरवले जाते.

फ्रँचायझी कोण घेऊ शकतो-
>> फ्रँचायझी घेणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
>> कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस फ्रँचायझी घेऊ शकतो.
>> फ्रँचायझी घेणाऱ्या व्यक्तीकडे मान्यताप्राप्त शाळेचे 8 वी पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
>> फ्रँचायझीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल.
>> निवड झाल्यावर इंडिया पोस्टसोबत MoU कॉन्ट्रॅक्ट करावे लागेल.

फक्त 5000 रुपये खर्च करावे लागतील
ही फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये खर्च करावे लागतील. फ्रँचायझी मिळाल्यानंतर तुम्ही कमिशनद्वारे कमाई करू शकाल. आपण किती कमाई करू शकता हे आपल्या कामावर अवलंबून असेल.

अधिकृत वेबसाइटला भेट द्या
या व्यतिरिक्त, या फ्रँचायझी साठी, आपण पोस्ट ऑफिसचे ऑफिशियल नोटिफिकेशन वाचावे आणि केवळ ऑफिशियल साइटवरूनच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी तुम्ही या ऑफिशियल लिंकवर क्लिक करू शकता https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf . येथून आपण फॉर्म डाउनलोड करू शकता आणि फ्रँचायझीसाठी अर्ज करू शकता. निवडलेल्या सर्व लोकांना पोस्ट डिपार्टमेंट सोबत MoU कॉन्ट्रॅक्ट करावा लागेल. तरच तो ग्राहकांना सुविधा देऊ शकेल.

कमिशन किती असते ?
>> रजिस्‍टर्ड आर्टिकल्‍सच्या बुकिंगवर 3 रुपये
>> स्पीड पोस्ट आर्टिकल्‍सच्या बुकिंगवर 5 रुपये
>> 100 ते 200 रुपयांच्या मनीऑर्डर बुकिंगवर रुपये 3.50
>> 200 रुपयांवरील मनीऑर्डरवर 5 रुपये
>> दरमहा रजिस्‍ट्री आणि स्‍पीड पोस्‍टच्या 1000 हून अधिक बुकिंगवर 20% अतिरिक्त कमिशन
>> टपाल तिकिटे, पोस्टल स्टेशनरी आणि मनीऑर्डर फॉर्मच्या विक्रीवर विक्रीच्या रकमेच्या 5% अतिरिक्त कमिशन
>> महसूल स्टॅम्प, सेंट्रल रिक्रूटमेंट फी स्टॅम्प इत्यादी विक्रीसह रिटेल सर्विसेजवर टपाल खात्याच्या कमाईच्या 40 टक्के.

Leave a Comment