Post Office Kisan Vikas Patra Scheme | पैशाची गुंतवणूक करत असताना आपण वेगवेगळ्या योजना पाहत असतो. बँक आणि पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करत असताना जास्तीत जास्त रिटर्न आणि पैशाची सुरक्षितता याकडे आपण बारकाईने लक्ष्य ठेवत असतो. कमी कालावधीत जास्तीत जास्त रिटर्न कसा मिळेल याकडे आपला जोर असतो. तुम्ही सुद्धा तुमचे पैसे कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसची एक खास योजना सांगणार आहोत, ज्यामध्ये अगदी काही दिवसातच तुमचे पैसे डबल होऊ शकतात. आता ही योजना नेमकी काय आहे. याबाबत जाणून घेऊयात.
काय आहे ही योजना? Post Office Kisan Vikas Patra Scheme
पोस्ट ऑफिसची ही योजना किसान विकास पत्र म्हणून ओळखली जाते. या योजनेवर सरकार सात टक्क्यांहुन अधिक व्याज लावते. या योजने अंतर्गत तुम्ही 1000 रुपयापासून गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्हाला सुरक्षित गुंतवणूकीसह उत्तम रिटर्न दिला जातो. तसेच यामध्ये वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार गुंतवलेल्या रकमेवर व्याज चक्रवाढ आधारावर मोजले जाते. म्हणून जर तुम्ही गुंतवणूकीसाठी कोणता पर्याय शोधत असाल तर हा एक उत्तम मार्ग आहे.
जॉईन खाते उघडून तुम्ही गुंतवणूक करू शकता
किसान विकास पत्र योजनेमध्ये (Post Office Kisan Vikas Patra Scheme) तुम्हाला नॉमिनीची सुविधाही उपलब्ध आहे. या योजनेनुसार तुम्ही 1000 रुपयापेक्षा अधिक गुंतवणूक यामध्ये करता येते. शिवाय ही गुंतवणूक झाल्यावर तुम्ही 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. तसेच या योजनेची विशेष बाब म्हणेज तुम्हाला संयुक्त खाते उघडून गुंतवणूक करता येऊ शकते.
कसे करता येतील दुप्पट पैसे?
गुंतवणूक केल्यानंतर पैसे कसे दुप्पट होतील याकडे सगळ्यांचे लक्ष असते. तर पैसे दुप्पट करण्यासाठी तुम्हाला या योजनेअंतर्गत 9 वर्ष 7 महिने अश्या कालावधीची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये तुम्ही जर 1 लाख रुपये गुंतवले तर या कालावधीत तुमची रक्कम 2 लाख रुपये एवढी होईल. जर 5 लाख रुपये गुंतवले तर 10 लाख रुपये मिळतील.
10 वर्षापेक्षा जास्त वयाचीही मुले काढू शकतात KVP खाते
पोस्ट ऑफिसची ही योजना (Post Office Kisan Vikas Patra Scheme) नागरिकांना फायद्याची तर आहेच. त्याचबरोबर यामध्ये वयवर्ष 10 पेक्षा जास्त असलेल्या मुलांना देखील स्वतःच्या नावाने KVP खाते उघडू शकतात. KVP खाते उघडण्यासाठी तुमचे ओळखपत्र लागते. तसेच तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज भरावा लागतो. त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम, चेक किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये जमा करावी लागेल. त्यानंतर तुमचे खाते तिथे ओपन होते आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.