Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिसची RD योजना!! 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून व्हा मालामाल

0
1
Post Office RD Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office RD Scheme – पोस्ट ऑफिसच्या आरडी (आवर्ती ठेव) योजनेला अनेक गुंतवणूकदारांची पसंती असल्याचे दिसून येत आहे. या योजनेत कमी रक्कम गुंतवून चांगला परतावा मिळवता येतो, ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्या लोकांमध्ये या योजनेचे महत्त्व वाढले आहे. पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 6.70% वार्षिक व्याजदर मिळतो आणि याचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. त्यामुळे ग्राहकांना अधिक नफा मिळवण्याची संधी मिळते. तर चला जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती .

100 रुपयांपासून गुंतवणूक –

आरडी योजनेत (Post Office RD Scheme) एका भारतीय नागरिकाला 100 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत महिन्याला गुंतवणूक सुरू करता येते. या योजनेमध्ये सहभागी होणारे गुंतवणूकदार नियमितपणे कमी रक्कम गुंतवून एक चांगला फंड तयार करू शकतात.

पोस्ट ऑफिसची आरडी योजना (Post Office RD Scheme)

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवणूक केल्यास विविध रकमेच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवता येतो. उदाहरणार्थ, महिन्याला 500 रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांच्या कालावधीत 30,000 रुपये जमा होतात आणि 6.70% वार्षिक व्याजावर 5,681 रुपये व्याज मिळवून रक्कम 35,681 रुपये होते. महिन्याला 1,000 रुपये गुंतवले तरी पाच वर्षांत गुंतवणूकदाराला 71,369 रुपये परत मिळतात. त्याचप्रमाणे, महिन्याला 2,000 रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी व्याज आणि मुद्दल मिळून एक लाख 42 हजार 732 रुपये परत मिळतात. मोठ्या गुंतवणुकीच्या दृष्टीने, महिन्याला 10,000 रुपये गुंतवले तर पाच वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदाराला 7,13,659 रुपये मिळतात. यामुळे, पोस्ट ऑफिसची आरडी योजना (Post Office RD Scheme) गुंतवणूकदारांसाठी एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरते.

अधिक लाभ मिळवून देणारी योजना –

पोस्ट ऑफिसच्या आरडी (Post Office RD Scheme) योजनेत गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना नियमितपणे आणि सुरक्षितपणे पैसा वाढवता येतो. हे गुंतवणूकदारांना एक उत्तम वित्तीय भविष्य निर्माण करण्यासाठी एक उपयुक्त साधन आहे. त्यामुळे, जे कोणत्याही सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक पर्यायाची शोधात आहे, त्यांनी पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करायला हवी. म्हणजे त्यांना अधिक लाभ मिळवता येईल.

हे पण वाचा : CM देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय! सर्व शासकीय सेवा घरबसल्या मिळणार