Post Office Savings Schemes | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये मिळतो FD पेक्षा जास्त परतावा, जाणून घ्या व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Post Office Savings Schemes | अनेक लोक हे त्यांच्या भविष्यासाठी काही ना काही रक्कम गुंतवणूक करत असतात. अगदी लहान बचत योजनापासून ते पोस्ट ऑफिस बचत योजनापर्यंत सगळेजण चांगल्या प्रकारे गुंतवणूक करत असतात. बँकांच्या FD पेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या काही बचत योजनांना सरकार देखील चांगलाच पाठिंबा दर्शवत आहे. त्यामुळे खूप कमी धोका असतो. यातून तुम्हाला चांगले व्याजदर देखील मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच बचत योजनाबद्दल माहिती सांगणार आहोत. जिथे तुम्हाला बँकेच्या एफडीपेक्षा जास्त परतावा मिळेल.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना | Post Office Savings Schemes

ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेली आहे. 60 वर्षावरील नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेत 1000 रुपयाच्या किमतीमध्ये गुंतवणूक करावी लागते. जास्तीत जास्त तुम्ही 30 लाख रुपयांपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याचप्रमाणे आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत या गुंतवणुकीवर कर सूट देखील उपलब्ध आहे.

किसान विकास पत्र

ही योजना भारत सरकारने जारी केलेली आहे. त्यामध्ये चांगला परतावा देखील उपलब्ध आहे. तिथे कर सवलतीचा कोणताही लाभ मिळत नाही. या योजनेत किसान विकास पत्राचा चक्रवाढ व्याज दर हा वार्षिक 7.5% एवढा आहे. या योजनेत गुंतवणूकदाराचे पैसे हे 115 महिन्यात म्हणजेच 9 वर्ष आणि 7 महिन्यात दुप्पट होतात.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्न मिळण्याचे सुविधा आहे. या योजनेमध्ये किमान दीड हजार रुपयांनी जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवतात या योजनेमध्ये कमाल मर्यादा 15 लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. या योजनेमध्ये वर्षाला 7.4% दराने व्याज मिळते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे | Post Office Savings Schemes

ही खात्रीशीर गुंतवणूक आणि बचत योजना आहे. येथे चक्रवाढ व्याज दर 7.7 टक्के प्रतिवर्ष आहे. ते मुदतपूर्तीवर दिले जाते. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. कमाल मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात. गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळवा.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

ही योजना भारत सरकारने भारतीय महिलांमध्ये बचत संस्कृतीला चालना देण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेत कोणताही कर लाभ नाही. व्याज उत्पन्न करपात्र आहे. गुंतवणूकदाराच्या आयकर स्लॅबनुसार कर कापला जातो. ही योजना ७.५ टक्के वार्षिक व्याज देत आहे. हा व्याज दर तिमाही चक्रवाढ आहे.