ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळणार पेन्शन; शासनाच्या ‘या’ योजनेचा वृद्धांना होईल फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वृद्धावस्थेत सर्वाधिक उपयोगी येते ती म्हणजे आयुष्यभर करण्यात आलेली बचत. यामध्ये तुम्ही जर योग्य ठिकाणी योग्य वेळी बचत केली असेल तर तिचा फायदा आवश्य तुम्हाला होतो. सध्याच्या घडीला तुम्हीही जर वृद्धावस्थेसाठी पैसे बाजूला टाकण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे ही योजना नक्की काय? तिचा फायदा कसा घ्यायचा जाणून घ्या..

शासनाकडून राबवली जाणारी पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी आणली गेली आहे. तसेच, ज्यांची वयाच्या 55 व्या वर्षी सेवानिवृत्ती झाली आहे, परंतु त्यांचे वय 60 वर्षापेक्षा कमी आहे , ते देखील VRS अंतर्गत आपले खाते उघडू शकतात. यासह सेवानिवृत्त संरक्षण सेवेतील कर्मचारी देखील 50 व्या वर्षी योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. परंतु या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे माहीत नसेल तर तेही जाणून घ्या.

अर्ज कसा करावा?

ज्या लोकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये SCSS खाते उघडू शकतात. परंतु हे खाते उघडण्यासाठी त्या व्यक्तीकडे किमान एक हजार रुपये किंवा कमाल 30 लाख रुपये जमा करावे लागणार आहेत. या खात्यामध्ये एक हजाराच्या जास्त पटीने देखील पैसे जमा केले जाऊ शकतात. परंतु ती रक्कम 30 लाखांपेक्षा जास्त नसायला हवी.

परतावा कसा मिळणार?

ज्येष्ठ नागरिक बचत योजना 8.2 टक्के वार्षिक व्याज देत असते. या योजनेमध्ये एखाद्या व्यक्तीने 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केले तर त्याला वार्षिक व्याज 2.46 लाख रुपये मिळेल. म्हणजेच ते दरमहा 20,000 रूपये इतके असेल.