Post Office Scheme : मित्रानो, सध्याची वाढती महागाई पाहता भविष्यासाठी आर्थिक तरतूद म्हणून पैशांची गुंतवणूक करतो. कारण हेच साठवलेले पैसे म्हातारपणी आपल्या कामी येणार असतात. मार्केट मध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. यामध्ये बँक एफडी, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट तसेच केंद्र सरकारच्या योजना अथवा पोस्ट ऑफिस योजना यामध्ये पैसे गुंतवले जातात. परंतु विषय पैशांचा असल्याने नेहमी सुरक्षित गुंतवणुकीला ग्राहक प्राधान्य देत असतात. तुम्ही सुद्धा भविष्याचा विचार करून काही रक्कमेची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसची अशी एक योजना सांगणार आहोत जमध्ये गुंतवणुकीतून तुम्ही मोठा फंड जमा करू शकतो. ही योजना कोणती आहे आणि याचे फायदे काय आहेत ते आज आपण जाणून घेऊयात…..
खरं तर पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) हे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मानलं जाते. पोस्ट ऑफिस भारत सरकारद्वारे चालवले जात असल्याने पोस्टाच्या सर्वच योजना परताव्याची हमी देतात. तसेच 80C अंतर्गत सर्व गुंतवणुकीवर कर सूट सुद्धा तुम्हाला मिळतो. पोस्टाच्या याच योजनांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)… जे गुंतवणूकदार दर महिन्याला नियमित बचत करतात त्यांच्यासाठी ही योजना म्हणजे गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी १००० रुपयांची आवश्यकता आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत (National Saving Certificate) गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन (Post Office Scheme) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट खरेदी करू शकता. या योजनेत दोन ते तीन लोक एकत्र गुंतवणूक करण्यासाठी संयुक्त खाते उघडू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची सूटही मिळते. समजा तुम्ही NSC अंतर्गत 15 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास, 7.7 टक्के व्याजदराने 6,73,551 रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर एकूण 21,73,551 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.
NSC बाबत अधिक माहिती – Post Office Scheme
पात्रता: सदर गुंतवणूकदार हा भारताचा नागरिक असावा .
व्याज दर: 7.7 टक्के
कमीत कमी गुंतवणूक: 1,000 रुपये
जास्तीत जास्त गुंतवणूक – मर्यादा नाही
लॉक- इन कालावधी: 5 वर्षे
आवश्यक कागदपत्रे-
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र किंवा सरकारी ओळखपत्र या डॉक्युमेंटची आवश्यकता लागेल.