हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर Post Office ची टाइम डिपॉझिट हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. POTD ला पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट असे म्हणूनही ओळखले जाते. जे कोणत्याही बँकेतील एफडीसारखीच आहे. तसेच यामध्ये गुंतवणूक करणाऱ्याला एका ठराविक कालावधीनंतर गॅरेंटेड रिटर्न देखील मिळतो. कोणत्याही भारतीय नागरिकाला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट उघडता येईल. हे कॅश आणि चेक द्वारे देखील उघडता येते. यावेळी चेकची तारीख ही खाते उघडण्याची तारीख म्हणून नोंदवली जाईल.
हे खाते उघडण्यासाठी कमीत कमी 1,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल तसेच यामध्ये जास्तीच्या रकमेची कोणतीही मर्यादा नाही. तसेच हे खाते जास्तीत जास्त तीन व्यक्तीना जॉईंट पणे उघडता येईल. त्याच वेळी, कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही निर्बंधांशिवाय एकापेक्षा जास्त खाती उघडता येतील. याशिवाय, यामध्ये खाते एका Post Office मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
लॉक इन पीरियड कसा असेल ???
या खात्याद्वारे कोणत्याही व्यक्तीला एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांच्या कालावधीसाठी आपले पैसे गुंतवता येतील. त्याच वेळी, Post Office मध्ये अर्ज करून खात्याचा कालावधी देखील वाढवता येऊ शकेल.
अशा प्रकारे असतील व्याजदर
या योजनेतील व्याज दर नियमितपणे सुधारित केले जातात, ज्याची गणना त्रैमासिक आधारावर केली जाते. तर पेमेंट हे वार्षिक आधारावर केले जाते. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी Post Office टाइम डिपॉझिट्सचे नवीन सुधारित दर खालीलप्रमाणे आहेत:
1 वर्ष – 5.5%
2 वर्षे – 5.5%
3 वर्षे – 5.5 %
5 वर्षे – 6.7%
इन्कम टॅक्समध्ये सूट
या योजनेमधूला गुंतवणूक करून इन्कम टॅक्समध्ये सूटही मिळू शकेल. यामध्ये इन्कम टॅक्सच्या कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करता येतो. मात्र, ही सूट फक्त पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठीच मिळेल. Post Office
मुदती आधीच पैसे काढण्याचा नियम काय आहे ???
यामध्ये, एखाद्या व्यक्तीला 6 महिन्यांपूर्वी जमा केलेली रक्कम काढण्याची परवानगी नाही. मात्र सहा महिने ते 12 महिन्यांच्या दरम्यान रक्कम काढल्यास त्यावर मिळणारे व्याज बचत खात्यावरील व्याज सारखे असेल. ज्या लोकांना फारसी जोखीम घ्यायची नाही अशा लोकांसाठी ही योजना खूपच फायदेशीर चांगली आहे. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Indian Overseas Bank च्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
Stock Market मधील ‘या’ सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 1.33 लाख कोटी रुपयांची वाढ
Investment : ‘या’ 5 लहान बचत योजनांमध्ये गुंतवणुक करून टॅक्स सूटसोबतच मिळवा चांगले रिटर्न
Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती !!!
Sovereign Gold Bond वर किती टॅक्स द्यावा लागतो तज्ञांकडून समजून घ्या !!!