मुंबई । तुम्हाला जर सुरक्षित आणि जोखीम नसलेली गुंतवणुक हवी असेल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे हे अगदी सुरक्षित मानले जाते. त्यामुळे अनेकजण पोस्ट ऑफिसमध्ये खाते कडून गुंतवणूक सुरूर करतात. पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडल्याने तुम्हाला आर्थिक फायदा तर होतोच पण त्यासोबतच टॅक्स मध्ये सूटही मिळते. जर तुमचेही पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर तुम्हाला एका आर्थिक वर्षात 3,500 रुपयांपर्यंत मिळणारे व्याज हे टॅक्स फ्री असते. आणि जाईंट अकाऊंटवर 7 हजार रुपयांपर्यंतचे व्याज हे टॅक्स फ्री असते.
पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यावर जवळपास 4 टक्के व्याज मिळू शकतो. देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या बचत खात्यावरील व्याजदर हा 2.7 टक्के आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणाऱ्यांना आकर्षक आणि ज्यादा व्याजदरासह इन्कम टॅक्स मध्येही सूट मिळते.
पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम या किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक पसंतीचे पर्याय मानले जातात. यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त व्याजदर मिळतो. पोस्ट ऑफिस बचत खात्यांसह या छोट्या बचत योजनांवरील व्याजदर हा दर तिमाहीनंतर बदलला जातो. दरम्यान जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याज दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही.
पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान 500 रुपये जमा करुन आपल्याला खाते उघडता येते. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटवरील व्याज दर हा दर महिन्याच्या 10 तारखेदरम्यान किंवा महिन्याच्या शेवटच्या दिवशी जमा होतो. यातून मेन्टनन्स फी म्हणून 100 कट केले जातात. जर खात्यातील बॅलन्स झिरो झाला तर ते खाते आपोआप बंद करण्यात येते.
अर्थ मंत्रालयाने 9 एप्रिल 2021 रोजी पोस्ट ऑफिसमधील बचत बँक खात्याबाबत अधिसूचना जारी केली होती. यात कोणकोणत्या व्यक्ती त्यामध्ये झिरो बॅलन्स खाते सुरु करु शकतात, याबाबतची माहिती देण्यात आली होती. यात, कोणताही सामान्य व्यक्ती जो कोणत्याही शासकीय कल्याणकारी योजनेचा रजिस्टर्ड मेम्बर असेल आणि पालकांद्वारे एखाद्या अल्पवयीन मुलाच्या बाबतीत ज्याचे नाव कोणत्याही शासकीय फायद्यासाठी रजिस्टर केले गेले असेल ते त्याचा लाभ घेऊ शकतात.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा