हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना सोमवारी मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ८ डिसेंबर २०२१ रोजी सीडीएस रावत यांचा तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. संपूर्ण देश त्यावेळी हळहळला होता.
रामनाथ कोविंद यांनी जनरल बिपिन रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांच्या कडे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्याशिवाय रामनाथ कोविंद यांनी काँग्रेस नेते गुलाम नबी, पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेते देवेंद्र झाझरिया यांना पद्मभूषण देऊन गौरविले. दुसरीकडे, एसआयआयचे एमडी सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा,कार्यक्षेत्रात हे पुरस्कार देण्यात आले. ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार उल्लेखनीय आणि अतुलनीय सेवेसाठी दिला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांची घोषणा केली जाते.