मोहित कंबोज यांना BMC ची नोटीस; ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नंतर आता मुंबई महापालिकेनं भाजप नेते मोहित कंबोज यांना नोटीस बजावली आहे. पालिकेचे अधिकारी कंबोज यांच्या घराची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळं कंबोज यांच्या अडचणीत भर पडली आहे.

मोहित कंबोज यांच्या घरात काही अनधिकृत बांधकाम झाले आहे का याची तपासणी पालिका अधिकारी करणार आहेत. मोहित कंबोज यांच्या खुशी पैराडाइज इमारतीत काही अतिरिक्त बांधकाम करण्यात आली आहे, असा पालिकेला शंका आहे.23 मार्च रोजी मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी इमारतीचा पाहणी करण्यासाठी येणार आहे असा नोटीस मध्ये उल्लेख आहे.

गेल्या काही दिवसांपासून मोहित कंबोज हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे आता कंबोज यांना पालिकेची नोटीस आल्यानंतर राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे.

मी तुमच्यासमोर झुकणार नाही- मोहित कंबोज
दरम्यान, काही खोटी केस माझ्याविरोधात होऊ शकली नाही म्हणून माझ्या घरी आज मुंबई महापालिकेची नोटीस पाठवण्यात आली आहे. कंगना रणौत असो वा नारायण राणे…. जर काही वाकडं करू शकले नाही तर घरच तोडून टाकण्याची कृती! काही हरकत नाही. हे देखील ठिक आहे. मात्र, काहीही करा, महाविका आघाडी सरकार, मी तुमच्यासमोर झुकणार नाही.

Leave a Comment