वीज वितरण युनियन : लाईन स्टाफचे इंधन भत्ता वाढीसाठी वाहन बंद आंदोलन सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन या संघटनेच्यावतीने वेतन करारामध्ये मंजूर केलेल्या लाईन स्टाफसाठी 2013 मध्ये वाढीव इंधन भत्ता मान्य केला होता. 2018 साली वेतनवाढ होत असताना वाढीव इंधन भत्त्याची नोंद झाली. मात्र अद्याप त्यांची अद्याप वाढ झालेली नाही. संघटनेने या विषयावर तीनवेळा नोटीस दिली. व्यवस्थापन अर्थिक बाबीच्या विषयावर दुर्लक्ष करत आहेत. ज्यावेळी वेतन करार होत असतो तेव्हाच अर्थिक तरतूद केलेली असते. लाईन स्टाफ हा महत्वाची भूमिका करत असतो. व्यवस्थावपन या विषयावर नकार देत नाही, मात्र मंजूरीसाठी आले असता मंजूरही केला जात नाही. तेव्हा लवकरात लवकर निर्णय व्हावा अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा केंद्रीय सरचिटणीस विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन आर .टी. देवकांत यांनी दिला.

कराड येथील अोगलेवाडी येथील वीज वितरण कार्यालया समोर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन या संघटनेच्यावतीने वाहन बंद आंदोलन सुरू आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. संघटनेकडून मागण्याची अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून होत नसलेल्या विलंबाच्या निषेधार्थ राज्यभर वाहन बंद आंदोलन सुरू आहे. कराड येथील विद्युत वितरण कार्यालयासमोर हे आंदोलन 4 दिवसापासून सुरू असून प्रशासनाकडून जोपर्यंत निर्णय होत नाही. तोपर्यंत वाहन बंद आंदोलन ठेवून प्रसंगी चालत जाऊन काम करणार असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान प्रशासनाचा यावेळी निषेध करण्यात आला.

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे राम चव्हाण म्हणाले, महावितरण प्रशासनाने वेतन करारवेळीच लाईन इंधन भत्त्याला मंजूरी दिली आहे. मात्र आजही त्यांना जाग येत नाही. केंद्रीय नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आम्ही आमरण उपोषणपर्यंत पर्याय अवलबू तेव्हा प्रशासनाने या विषयाकडे टाळाटाळ न करता योग्य ती दखल घ्यावी.

Leave a Comment