.… म्हणून शेलारांनी मध्यावधी निवडणूकांबाबत विधान केले; चंद्रकांतदादांनी सांगितले ‘हे’ कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्यात काही दिवसांत मध्यावधी निवडणूका होतील अस वक्तव्य केले होते. शेलारांच्या या विधानांनंतर राज्यात राजकीय तर्क- वितर्काना उधाण आले होते. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आशिष शेलारांच्या विधानामागचं नेमकं कारण सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आशिष शेलारांचं विश्लेषण या आधारावर आहे की इतके भांडूनही हे कुणी बाहेर पडत नाहीत. भांडणाचे दोनच परिणाम होतात. एक तर आघाडीतून बाहेर पडणं किंवा दुसरं म्हणजे निवडणुकीला सामोरं जाणं. हे बाहेर पडतच नाहीत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान राज्यात मध्यावधी किंवा नियमित निवडणुका झाल्या, तरी भाजप आपल्या ताकदीवर निवडणुका लढवेल. विधानसभेच्या २८८ किंवा लोकसभेच्या ४८ जागा लढवण्याची देखील आमची तयारी आहे असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

Leave a Comment