हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PPF Scheme) अलीकडच्या काळात गुंतवणुक करणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसली आहे. कारण कमीत कमी गुंतवणूक करून अधिक नफा मिळत असेल तर तो कुणाला नको असतो, नाही का? पण याचा फायदा काही चिटर्स घेतात. इतके रुपये गुंतवा झटपट श्रीमंत व्हा, लखपती व्हा, करोडपती व्हा किंवा एक का डबल अशा फसव्या स्कीम्सचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. या फसव्या जाहिराती करून हे लबाड आपल्या मेहनतीचा पैसा अगदी सहज लुबाडतात.
अशावेळी आपल्याला जोखीममुक्त आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय हवा असेल तर यासाठी सरकारी योजना कधीही उत्तम. सध्या लोकांचा गुंतवणुकीकडे वाढणारा कल पाहता काही योजना जोखमीच्या असतात याची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला अशा एका सरकारी योजनेची माहिती देणार आहोत, ज्यामधून तुम्ही फक्त ५०० रुपयांच्या गुंतवणूकीपासून सुरुवात करून अगदी लाखो रुपये कमवू शकता. चला तर जाणून घेऊयात हि योजना नक्की कोणती आहे? (PPF Scheme)
मित्रांनो, आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती योजना म्हणजे PPF योजना. अत्यंत सुरक्षित, खात्रीशीर आणि चांगल्या परताव्यासाठी हि सरकारी योजना नक्कीच तुमच्या गुंतवणुकीसाठी योग्य ठरू शकते. सध्या PPF अंतर्गत ७.१ टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस ते सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्येसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता.
PPF खाते (PPF Scheme)
जर तुम्हाला PPF योजनेअंतर्गत खाते सुरु करायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्याची जबरदस्ती केली जात नाही. या योजनेत प्रति महिना केवळ ५०० रुपये गुंतवणुकीपासून सुरुवात करून अगदी आरामात मोठा नफा मिळवता येतो. या खात्यात कमीत कमी ५०० ते जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
० मॅच्युरिटी कालावधी
PPF खात्याची मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांची असून ती पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सगळे पैसे काढून घेऊ शकता. मात्र, मॅच्युरिटीदरम्यान पैशांची गरज नसेल तर तुम्ही आणखी ५ वर्षांसाठी याचा कालावधी वाढवून घेऊ शकता. परंतु, यासाठी तुम्हाला १ वर्ष आधीच अर्ज करावा लागतो.
० लॉकइन कालावधी
PPF खाते सुरु केल्यापासून ५ वर्षांच्या आत तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पैसे काढायची वेळ आली तरीही तुम्ही ही रक्कम काढू शकत नाही. (PPF Scheme) कारण PPF योजनेअंतर्गत ५ वर्षांचा ‘लॉकइन कालावधी’ असतो. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर फॉर्म २ भरून तुम्ही पैसे काढू शकता. मात्र हि बाब लक्षात घ्या कि, कोणत्याही कारणास्तव PPF योजनेअंतर्गत खात्याच्या मॅच्युरिटी आधी पैसे काढल्यास १ टक्के व्याज कापले जाते.
० कर लाभ
(PPF Scheme) PPF योजना ही ईईई श्रेणीत असल्यामुळे या अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर कर लाभ मिळतो. सोबतच मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या व्याजावरदेखील कर लाभ मिळतो. इतकेच नव्हे तर, PPF योजनेत आयकर कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांचा एकूण वार्षिक कर लाभ मिळू शकतो.
० कमी गुंतवणुक जास्त नफा
PPF योजनेत प्रतिमहिना ५०० रुपये गुंतवण्यापासून सुरुवात करता येते. हि गुंतवणूक योजनेच्या अटीनुसार १५ वर्षांसाठी करावी लागते. त्यानुसार, योजनेच्या मॅच्युरिटी दरम्यान एकूण गुंतवणूक ९०,००० रुपयांवर एकूण व्याज ७२,७२८ रुपये इतके मिळून तुम्हाला १ लाख ६२ हजार ७२८ रुपये मिळतील. अशाप्रकारे कमीत कमी गुंतवणूक करून तुम्ही अधिक नफा मिळवू शकता. (PPF Scheme)