PPF आहे खूपच कामाची गोष्ट, कर्जही मिळतं अन टॅक्स मध्ये सूटदेखील; जाणून घ्या या 10 गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पैसापाण्याची गोष्ट सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) म्हणजेच PPF ही देशातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय बचत योजनांपैकी एक आहे. मात्र अनेक गुंतवणूकदारांना पीपीएफ बाबत अधिक माहिती नसते. म्हणूनच ते त्यात गुंतवणूक करणे टाळतात. आज आपण पीपीएफच्या 10 खास गोष्टींबाबत आणून घेणार आहोत. तुम्ही जर पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर त्यापूर्वी हा लेख तुम्ही नक्की वाचा.

PPF scheme in marathi

1) एक व्यक्ती, एक खाते

तुम्ही आयुष्यात कधीही तुमच्या नावाने PPF खाते उघडू शकता. पीपीएफमध्ये जॉईंट खाते उघडण्याची कोणतीही तरतूद नाही. तुम्ही एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडले असल्यास, पहिले खाते वगळता सर्व निष्क्रिय केले जातील. मग तुम्हाला त्या खात्यांमध्ये तुमच्याद्वारे जमा केलेली रक्कमच परत मिळेल म्हणजेच व्याजाचा एक रुपयाही मिळणार नाही.

2) व्याजदर किती आहे? (PPF Interest Rate)

PPF मधील व्याज दर निश्चित नाही, परंतु तो 10 वर्षांच्या कालावधीसह सरकारी रोख्यांच्या उत्पन्नाशी जोडलेला आहे. सरकार प्रत्येक तिमाहीत पीपीएफसाठी त्याच्या सिक्युरिटीजवर मिळणाऱ्या उत्पन्नाच्या (परताव्याच्या) आधारावर व्याजदर निश्चित करते. 1968-69 मध्ये, PPF वर व्याजदर 4% इतके होते. नंतर 1986-2000 मध्ये व्याजदर 12% पर्यंत वाढले. गेल्या तीन महिन्यांत बाँडचे उत्पन्न वाढले आहे. परंतु लहान बचत योजनांमधील दर आधीच निर्धारित केलेल्या दरांपेक्षा जास्त आहेत. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी म्हणजेच जून 2022 पर्यंत, पीपीएफ वरील वीजदर साधारण 7.10 टक्के निश्चित करण्यात आले आहे.

3) अल्पवयीन व्यक्तीसाठी खाते? (PPF For Minor)

PPF for Minor Child

होय. पीपीएफ मध्ये अल्पवयीन व्यक्तीच्या नावानेही खाते उघडता येते. तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलाच्या नावाने पीपीएफ खाते देखील उघडू शकता. मात्र सदर खाते हे सर्वस्वी मुलाचे खाते असेल, आपण फक्त पालक असाल. तुम्ही तुमच्या प्रत्येक मुलासाठी खाते उघडू शकता. मुलाचे आई-वडील जिवंत असताना आजी-आजोबा त्यांच्यासाठी पीपीएफ खाते उघडू शकत नाहीत. जर पालकांनी आजी-आजोबांना मुलाचे कायदेशीर पालक म्हणून नियुक्त केले असेल तर पालकांच्या मृत्यूनंतर आजी आजोबा मुलांसाठी पीपीएफ खाते उघडू शकतात.

4) वर्षाला किमान 500 रुपये जमा करावे लागतील

खाते सक्रिय ठेवण्यासाठी, खात्यात वार्षिक किमान 500 रुपये जमा करावे लागतील. तर आर्थिक वर्षात (एप्रिल ते मार्च) जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयेच जमा करता येतील. जर तुम्ही तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या नावाने खाती उघडले असतील, तर सर्व खात्यांमध्ये मिळून जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणुकीची रक्कम असेल. तुम्ही पीपीएफ खात्यात वार्षिक मर्यादेपेक्षा म्हणजेच 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवल्यास त्यावर व्याज मिळणार नाही. कलम 80C अंतर्गत सदर रकमेवर तुम्हाला कर सूट मिळू शकणार नाही. ही रक्कम तुम्हाला व्याजाशिवाय परत केली जाईल.

5) पीपीएफ खाते कसे उघडावे

PPF Account

सरकारने काही पोस्ट ऑफिस आणि काही बँकांना PPF खाती उघडण्याचे अधिकार दिले आहेत. तुम्ही या नियुक्त पोस्ट ऑफिसेस किंवा बँक शाखांना भेट देऊन तुमचे खाते उघडू शकता. काही बँका ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधाही देत ​​आहेत. अशा बँकांमध्ये तुम्ही घरी बसूनही पीपीएफ खाते उघडू शकता. पीपीएफच्या अर्जामध्ये (फॉर्म-ए) नॉमिनी कॉलम नाही, त्यामुळे जर एखाद्याला नॉमिनी बनवायचे असेल, तर खाते उघडताना फॉर्म-ई नक्कीच भरा.

6) PPF खात्यावर कर्ज घेता येते का?

Money

 

तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यावर कर्ज देखील घेऊ शकता आणि जमा केलेल्या रकमेचा काही भाग काढू शकता. आजकाल पीपीएफ खाते मॅच्युरिटीपूर्वी बंद करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तथापि, खाते उघडण्याच्या तारखेपासून किमान पाच आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही प्रकरणांमध्ये त्यास परवानगी दिली जाऊ शकते. सदर खातेदार, त्या खातेधारकाची मुले, त्या खातेधारकाचा पती किंवा पत्नी, आई वडील यांच्या गंभीर अशा जीवघेण्या आजारांच्या उपचारांसाठी आणि खातेदाराच्या उच्च शिक्षणासाठी असे केले जाऊ शकते.

7) आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे

PPF आपत्कालीन परिस्थितीत गुंतवणूकदारांना आंशिक पैसे काढण्याची परवानगी देते. सहा वर्षांनंतर, गुंतवणूकदार त्याच्या चौथ्या वर्षाच्या अखेरीस मागील वर्षाच्या शिल्लक रकमेच्या 50 टक्के, यापैकी जे कमी असेल ते काढू शकतो. अतिरिक्त योगदानाशिवाय खाते सुरू ठेवल्यास, ग्राहक खात्यातून कोणतीही रक्कम काढू शकतो. परंतु खाते अतिरिक्त योगदानासह सुरू ठेवल्यास, मुदतवाढीच्या प्रारंभी एकूण शिल्लक रकमेच्या 60 टक्के रक्कम काढण्याची मर्यादा आहे.

8) कर सूट (PPF Tax Benefit)

PPF TAX Benefit

PPF मध्ये गुंतवलेली रक्कम आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे. इतकेच नाही तर या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज कलम 10 अंतर्गत कर सवलत मिळण्यासही पात्र आहे. पीपीएफला तिहेरी कर लाभ असलेली योजना म्हणतात. ट्रिपल टॅक्स बेनिफिट म्हणजे जर तुम्ही एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर मिळालेल्या व्याजावर आणि मॅच्युरिटीवर मिळालेल्या संपूर्ण रकमेवर कोणताही कर लागणार नाही.

9) तुम्ही 1 ते 5 या तारखांना पीपीएफ खात्यात पैसे भारत असाल तर होईल फायदा

Money

जर तुम्हाला PPF मध्ये गुंतवणूक करायची असेल तर दर महिन्याची 5 तारीख खूप महत्वाची आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत १ ते ५ तारखेपर्यंत पीपीएफ खात्यात पैसे टाकले पाहिजेत. वास्तविक, PPF मधील व्याज दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत खात्यातील किमान शिल्लक रकमेवर मोजले जाते. तुम्ही दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पैसे जमा केल्यास, तुमची किमान शिल्लक वाढते आणि तुम्हाला जास्त व्याज मिळते.

10) 15 वर्षे गुंतवणूक

ही केंद्र सरकारची दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे, जी PPF कायदा, 1968 मध्ये प्रदान करण्यात आली आहे. PPF ही 15 वर्षांची मॅच्युरिटी योजना आहे, जी तुम्हाला हवी तेवढी 5-5 वर्षांसाठी वाढवता येते. पीपीएफ खात्यात वर्षातून जास्तीत जास्त 12 वेळा पैसे जमा करता येतात. अनेक गुंतवणूकदार पुन्हा पुन्हा पैसे टाकण्याऐवजी एकरकमी रक्कम गुंतवतात. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एप्रिल 2008 मध्ये PPF खाते उघडले असेल तर ते एप्रिल 2023 मध्ये परिपक्व होईल.

Leave a Comment