प्राचीने इतिहास रचला ! पॅरा वर्ल्ड कपमध्ये ‘कॅनो’त पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मध्य प्रदेशची पॅरा कॅनो खेळाडू प्राची यादवने (Prachi Yadav) पॅरा कॅनो वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. या स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले आहे. पोलंडच्या पोजनन शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. तिने महिलांच्या 200 मीटर वीएल-2 इवेंटमध्ये हे यश मिळवले आहे. कयाकिंग आणि कॅनोइंगमध्ये पदक जिंकणारी प्राची (Prachi Yadav) भारताची पहिली महिला खेळाडू बनली आहे. या अगोदर प्राचीने टोक्यो पॅरालिंपिक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.

प्राचीने या स्पर्धेत 1:04.71 सेकंदाच्या वेळेसह कास्यपदक मिळवलं. कॅनडाच्या ब्रिआना हेनेसी प्राचीपेक्षा पुढे होती. तिने 1:01.58 सेकंदाच्या वेळेसह रौप्यपदक मिळवलं. ऑस्ट्रेलियाच्या सुजैन सायपेलने 1:01.54 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. कयाकिंग आणि कॅनोइंग या क्रीडा प्रकारात भारताकडून हे आतार्यंतचं सर्वोत्तम प्रदर्शन आहे. 26 मे रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली होती.

लॉक डाउनमध्येही विशेष परवानगीने ट्रेनिंग प्राची यादवचं (Prachi Yadav) छोट्या आकाराच्या तलावामध्ये मागच्या चार वर्षांपासून कठोर प्रशिक्षण सुरु आहे. प्राचीने लॉक डाउमध्येही विशेष परवानगी घेऊन आपली ट्रेनिंग सुरुच ठेवली होती. प्राचीचे (Prachi Yadav) कोच मयंक ठाकूर यांनी तिच्या प्रदर्शनावर आनंद व्यक्त केला आहे. प्राची भरपूर मेहनती आहे. ती आपलं सर्व लक्ष खेळावरच केंद्रीत करते असे प्राची यादवचे कोच मयंक ठाकूर म्हणाले.

हे पण वाचा :

नाशिकमध्ये रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकीची आत्महत्या

बड्डे आहे भावाचा !!! जल्लोष साऱ्या गावाचा !!!

राज्यसभा निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास…; संजय राऊतांचा थेट फडणवीसांना इशारा

राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी कपात केली जाणार ???

आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!

 

Leave a Comment