ठाण्यात भरदिवसा तरुणीची धारधार चाकूने हत्या

2
109
Thumbnail 1533380571682
Thumbnail 1533380571682
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे | महाविद्यालयाला निघालेल्या तरुणीची युवकाने धारधार चाकूने भरदिवसा हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. या घटनेने ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामधे प्राची झाडे (वय २२) हीचा मृत्यु झाला असून आरोपी आकाश पवार (वय २५) याला पोलीसांनी अटक केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

धक्कादायक! गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार

एकतर्फी प्रेमातून त्याने चक्क माॅडेलला ठेवले ओलीस, पोलीसांवर केला गोळीबार

हाती आलेल्या माहीतीनुसार, प्राची सकाळी काॅलेजला दुचाकीवरुन जात असताना आकाशने तिला रस्त्यात अडवले आणि तिच्यावर धारधार चाकूने हल्ला केला. सदरील घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता घडली. या हल्ल्यात प्राची रक्तबंबाळ होऊन रस्त्यात पडली असता स्थानिकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरन्यान तिचा मृत्यु झाला. चाकूने हल्ला करुन आकाश पवार घटना स्थळावरुन पसार झाला. परंतु पोलीसांनी त्याला शोधून काढले आणि अटक केले.

आकाश आणि प्राची मागील तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते असे तपासातून समोर आले आहे. परंतू गेल्या काही दिवसांत त्यांच्यात तणाव निर्मान झाला होता. याआधीही आकाशने प्राची हिस मारहान केली होती. तसेच आकाश विरोधात प्राचीने पोलीसांत तक्रारही नोदवली असल्याचे दिसत आहे. हत्येमागील नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here