भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. भारतामध्ये जवळपास 70% हून अधिक लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त संख्या खेडेगावात राहत असल्यामुळे अनेक लोक शेती करतात. त्याचप्रमाणे शेतीला जोडून उदरनिर्वाहासाठी अनेक शेतकरी हे पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यांसारखे जोड व्यवसाय करतात. ज्यातून त्यांना थोडाफार आर्थिक फायदा होतो. सरकार देखील त्यांच्या या जोड व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन योजना आणत असतात. तसेच आता केंद्र सरकारसोबत विविध राज्यांच्या सरकारने ही मत्स्य शेतीला प्रोत्साहन दिले आहे. यासाठी आता अनुदान देखील दिले जात आहे. तुम्ही अगदी छोट्या प्रमाणात देखील मत्स्य व्यवसाय (Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) सुरू करून चांगली कमाई करू शकता. या मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून तुम्हाला तब्बल 60 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने मत्स्यसंपदा योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये तुम्हाला 60% सबसिडी मिळणार आहे.
योजनेतील सर्व विभागांना अनुदान
प्रधानमंत्री मत्स्य संपदा (Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) योजनेअंतर्गत महिला अनुसूचित जाती, जमातींना अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांनाही या योजनेत सामावून घेतले आहे. त्यांना 40 टक्के अनुदान दिले जात आहे. तुम्ही अगदी घरच्या घरी सिमेंटची टाकी करून देखील हे मत्सपालन करू शकता. यातून देखील तुम्हाला अनुदान मिळेल.
घरात बसून करा मत्स्यपालन | Pradhan Mantri Matsya Sampada Yojana
हे मत्स्य पालन तुम्ही घरामध्ये दोन प्रकारे करू शकता. यामध्ये तुम्ही सिमेंटची टाकी बनवून त्यामध्ये मासे टाकू शकता. त्याचप्रमाणे दुसरी म्हणजे प्लास्टिकची टाकी करून त्यामध्ये 70 ते 80 किलो मासे ठेवू शकता. त्याचबरोबर प्लास्टिकच्या टाकीत मासे पाळण्यासाठी एका वेळेस 10 हजार सिंधीमत्स्य 20 टाकीमध्ये ठेवा. त्यांची योग्य वाढ होण्यासाठी चार महिने लागतात. तुम्ही एका टाकीत मासे पाळल्यावर तुम्हाला कमीत कमी 2 लाख रुपयांचा नफा मिळेल.
योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला होम पेज ओपन होईल तिथे तुम्हाला या योजनेच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर एक फॉर्म भरण्याचा पर्याय येईल. त्यानंतर विचारलेल्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करा.
- यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, जमिनीच्या तपशील यांसारखी माहिती भरावा लागेल.
- सर्व कागदपत्र झाल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करा आणि तुमचा फॉर्म सबमिट करा