सातारा | सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकीत इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात शेखर गोरे यांचा दारुण पराभव झाला आहे. शेखर गोरे याना फक्त 379 मते मिळाली असून प्रतिस्पर्धी उमेदवार प्रदीप विधाते यांना 1459 मते मिळाली आहेत. त्यामुळे शेखर गोरे यांचा तब्बल 1080 मतांनी दारुण पराभव झाला आहे. शेखर गोरेंसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत या वर्षी राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनेलकडून इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांच्या विरोधात शेखर गोरे यांनी उमेदवारी दाखल केली होती. प्रदीप विधाते या मतदारसंघात निवडून येतील याविषयी कोणाच्या मनात शंका होती. मात्र या मतदारसंघात काहीतरी भलत-सलत सुद्धा घडू शकते, अशी भीती राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली होती.
परिणामी प्रदीप विधाते यांनी या मतदारसंघावर बारकाईने नजर ठेवली होती. विरोधी उमेदवारावर ही त्याची नजर होती. त्यांना एकूण 1459 इतकी मते मिळाली असून प्रतिस्पर्धी उमेदवार शेखर गोरे यांचा त्यांनी 1080 इतक्या मतांनी पराभव केला आहे या निवडणुकीत गोरे यांना 359 इतकी मते मिळाली आहेत