तुरुंगातून निवडणूक लढवून प्रभाकर घार्गेंनी मारली बाजी : राष्ट्रवादीला धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीप्रणित सहकार पॅनेलची पहिली उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटावमध्ये येऊन जाहीर केली होती. ‘मी जिल्हा लेव्हलचे काही पाहत नाही. मी फक्त राज्यातच पाहतो,’ असे सांगून अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून नंदकुमार मोरे यांच्या नावाची घोषणा केली होती. वास्तविक राष्ट्रवादीचा निर्णय माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि त्यांच्या गटाला रुचला नव्हता. परिणामी घार्गे यांनी कारागृहात असतानाही न्यायालयाची परवानगी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आणि काही झालं तर मी मैदानातच आहे. मैदानातून पळ काढणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देत आपली उमेदवारी कायम ठेवली. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला तरीही ते मागे हटले नाहीत.

सातार्‍यात राडा : शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी कोणत्याही नेत्याचे पाठबळ नसताना स्वतःच्या ताकदीवर राष्ट्रवादीचा पराभव केला आहे. घार्गे यांना 56 इतकी मते मिळाली असून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार नंदकुमार मोरे यांचा 10 मतांनी पराभव केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या हाताने निदान खटाव तालुक्यात का होईना राष्ट्रवादीची माती केली आहे.

खटाव प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ निकाल

एकूण मते – 103
झालेली मते – 103

वैध मते – 102
अवैध मते – 01

उमेदवार  मिळालेली मते
प्रभाकर घार्गे –  56
नंदकुमार मोरे – 46

विजयी उमेदवार – प्रभाकर घार्गे
मतांचे लीड – 10

हे पण वाचा –

शशिकांत शिंदेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी ; राष्ट्रवादी कार्यालय फोडले

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा 7 मतांनी पराभव; पाटणकरांनी मारली बाजी

शशिकांत शिंदेंचा अवघ्या 1 मताने पराभव; जावळीतून ज्ञानदेव रांजणे विजयी

भाजप -राष्ट्रवादीची गठ्ठी, उंडाळकरांची इठ्ठी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी

पराभवानंतर आ. शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

सहकार पॅनलमधून ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे विजयी

शेखर गोरे यांना धक्का; तब्बल 1080 मतांनी दारुण पराभव

शशिकांत शिंदें यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांचे हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Leave a Comment