हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीत बहुमतांनी विजयी झाल्यानंतर NDA पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या रविवारी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासह इतर मंत्र्यांनाही शपथ देण्यात येईल. ज्यात महाराष्ट्रतून अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांचाही समावेश असेल. कारण की, अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) मंत्रिपदासाठी प्रफुल पटेल यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
दिल्लीत पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या बाजूने प्रफुल पटेल यांच्या नावाची निवड केली आहे. यासह
देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची देखील मंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या राष्ट्रपती भवनात हे सर्व नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. ज्यात प्रफुल पटेल देखील शपथ घेताना दिसतील. आता फक्त प्रफुल पटेल यांच्याकडे कोणते खाते देण्यात येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सत्ता स्थापनेकरिता एनडीएकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी चार खासदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. या सत्ता स्थापनेनंतर लवकरच खाते वाटप ही करण्यात येईल. यामध्ये भाजपकडे अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालय अशी खाती राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाकी राहिलेली कृषी, रेल्वे, पंचायत राज आणि इतर खाती कोणाला मिळतील, याबाबत अजून प्रश्नचिन्ह आहे. तसेच, उद्या भाजप आणि शिंदे गटाचे नेमके कोणते खासदार शपथ घेतील? हे पाहणे ही महत्त्वाचे ठरणार आहे.