राष्ट्रवादीच्या मंत्र्याना ईडीचा दणका; 13 कोटींची संपत्ती जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर बॅकफुटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक मोठा दणका बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची 13 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

प्राजक्त तनपुरे यांची साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. जवळपास 10 तासांपेक्षा अधिक वेळ प्राजक्त तनपुरेंची चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने कारवाई करत प्राजक्त तनपुरे यांची 13 कोटी 41 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट २०१९ मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरू केली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये तनपुरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरू असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर पीएमएलएनुसार कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.

Leave a Comment