Prajakta Mali : ‘भिशी मित्र मंडळ’मध्ये लाडक्या प्राजूची एंट्री; पुण्यात पार पडला मुहूर्त, लवकरच शूटिंग सुरु करणार

Prajakta Mali
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prajakta Mali) मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव हे आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून प्राजक्ताने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. आता लवकरच ती आपल्याला पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटातून भेटायला सज्ज झाली आहे. ‘भिशी मित्र मंडळ’ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. याप्रसंगी अभिनेत्री प्राजक्ता माळीसोबत या चित्रपटाचे निर्माते, प्रस्तुतकर्ते, लेखक, दिग्दर्शक आणि तांत्रिक टीम आवर्जून उपस्थित होती.

‘भिशी मित्र मंडळ’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अमोल कागणे आणि शरद पाटील हे आहेत. तर किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. (Prajakta Mali) सागर पाठक लिखित, सुमित संघमित्र दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच पुणे येथे सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच संजीवकुमर चंद्रकांत हिल्ली हे या चित्रपटासाठी सिनेमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत. एक आगळा वेगळा सिनेमा घेऊन ही टीम प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास आता सज्ज झाली आहे.

भिशी म्हणजे काय? तर भिशी म्हणजे ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करतात आणि ते टप्प्याटप्प्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात. (Prajakta Mali) साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून ते एका सदस्याला दिले जातात. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. त्यामुळे या विषयावरील चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता बघायला मिळेल.

(Prajakta Mali)या चित्रपटाचा पुण्यात मुहूर्त पार पडला असून येत्या काही दिवसांतच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात येईल. यासाठी पुण्यातील काही महत्वाच्या आणि सुंदर लोकेशन्सची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण टीम उत्साहाने या नव्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. तसेच प्राजक्ता माळीचा हा नवा चित्रपट एक वेगळा विषय वेगळ्या पद्धतीने मांडणारा आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत प्राजक्ता माळी स्वतः देखील तिच्या चाहत्यांइतकी उत्सुक आहे. तसेच धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक असलेल्या ‘भिशी मित्र मंडळ’ या चित्रपटात प्राजक्तासोबत आणखी कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार? हे पाहण्यासाठी अजुन थोडीशी वाट पहावी लागणार आहे.