हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील वर्सेस लक्ष्मण हाके… कट टू मनोज जरंगे पाटील वर्सेस प्रकाश आंबेडकर… राज्यात आरक्षणाचा मुद्दा गरमागरमीचा झालेला असताना मराठा आणि ओबीसी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत… जरांगे पाटलांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून सरकारला एकीकडे इशारा दिलाय… दुसरीकडे सरकारनं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पण त्याला विरोधकांनी प्रतिसाद दिला नसल्याचं समजतंय… लक्ष्मण हाकेंना सरकारचा शब्द मिळाल्यापासून ते शांत झालेत… त्यामुळे मैदानात फक्त आहेत ते जरांगे पाटील… जरांगे इफेक्ट पुन्हा एकदा महाराष्ट्रात गरम होत असून त्यांच्या शांतता रॅलीला मोठा प्रतिसादही मिळतोय… पण जरांगेच्या ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी आता थेट मैदानात उतरलेत ते प्रकाश आंबेडकर…
आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेत आरक्षण बचाव यात्रा काढण्याची घोषणा करून महाराष्ट्राचे सोशियो पॉलिटिकल डायनामिक्स(text) बदलून टाकलेत… त्यामुळे एकीकडे ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील तर चालू आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचं स्वतंत्र ताट देण्याची भूमिका घेतलेले प्रकाश आंबेडकर आता एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत… त्यामुळे जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मागण्यांचं पुढे काय होईल? आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा नेमकी आहे तरी काय? त्याचाच हा आढावा…
तर छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून प्रकाश आंबेडकरांनी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार असल्याचं आज जाहीर केलं… एसी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षण हक्कासाठी आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनास सुरुवात केलेली आहे, आणि दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, त्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हते. या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय? असा जाबही त्यांनी यावेळेस सर्वच राजकीय पक्षांना विचारला…
आता ही यात्रा नेमकी काय असेल? ते पहा… तर आरक्षणासाठी काम करणाऱ्या काही सामाजिक संघटना आणि वंचित बहुजन आघाडी सोबत मिळून 25 तारखेला दादर चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात होईल… 26 जुलै रोजी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रेला सुरुवात होईल… कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना या जिल्ह्यात ही यात्रा निघणार आहे. 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे या यात्रेची सांगता होईल. या मार्गावरती कॉर्नर बैठका ठेवण्यात येतील… त्यातील मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील…
या यात्रेच्या काही प्रमुख मागण्याही असणार आहेत…
ज्यामध्ये
1-ओबीसींच्या आरक्षण वाचलं पाहिजे
2-एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप डबल झाली पाहिजे,
3-ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटीची स्कॉलरशिप तशीच्या तशी लागू झाली पाहिजे
4-घाई गर्दीमध्ये कास्ट फॉर्म इशू करण्यात आला आहे, तो रद्द करण्यात यावा.
5-जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच
6-आरक्षणात एससी एसटी आणि ओबीसींना पदोन्नती मिळाली पाहिजे… अशा एकूण सहा मागण्या घेऊन या संपूर्ण यात्रेचा प्रवास होईल
थोडक्यात काय तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ, शरद पवार, महायुती सरकार, लक्ष्मण हाके यांच्यानंतर आता थेट बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणाला धक्का न लागण्याची…ओबीसी, एससी आणि एसटी आरक्षणाच्या संरक्षणाची… भूमिका घेतल्याने महाराष्ट्राचं सामाजिक, राजकीय वर्तमान ढवळून निघणार आहे… पण आंबेडकरांनी अशी भूमिका नेमकी का घेतली असावी ? व त्याची काही उत्तरही समोर येतात…
पहिलं म्हणजे मुळात आंबेडकरांचा पक्षच वंचित, दुर्बल, शोषित सामाजिक घटकांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी काम करत असल्यामुळे आरक्षणावरून सुरू झालेल्या या गोंधळात बाबासाहेबांचे नातू, वंचितचे प्रमुख या नात्याने घेणे क्रमप्राप्त होतं…
दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांची भूमिका अस्थिर दिसली… कधी महाविकास आघाडी… मनोज जरांगे पाटील… फक्त काँग्रेस…आणि तिकीट वाटपाचा घोळ… या सगळ्याचा परिणाम म्हणजे वंचितच्या तब्बल 35 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं… लोकसभेला हात पोळल्यामुळे वंचितला विधानसभा निवडणुकीच्या आधी सोशल इंजीनियरिंग करणं भाग होतं…त्यामुळे ओबीसी, एससी आणि एसटी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणाची भूमिका घेऊन त्यांनी एक मोठं वर्तुळ आखलय… दलित आणि वंचित वोट बँक सोबतच ओबीसी समाजाला आपल्या सोबत जोडून घेण्याचा प्रयत्न या यात्रेतून होऊ शकतो…
खरंतर लोकसभेला संविधान बदलाच्या नरेटीवचा फायदा महाविकास आघाडीला झाला… पण बाबासाहेबांचे नातू या नात्यानं खरतर त्यांनी ही भूमिका तेव्हाच घेतली असती तर ती फायद्याची ठरली असती…पण देर आये दुरुस्त आये… या न्यायानं आंबेडकरांनी संविधानाची भूमिका येणाऱ्या विधानसभेला प्रभावीपणे मांडण्याचा विचार केलेला दिसतोय… सर्वात शेवटचं आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे ही यात्रा ज्या पट्ट्यातून जातेय तिथं साखरपट्टा ते मराठवाडा अशा विविध भागांचा समावेश आहे… त्यामुळे या रूटवरून जाताना तिथलं राजकारण ढवळून काढण्याचा प्रयत्न देखील यात्रेच्या माध्यमातून होऊ शकतो…अर्थात ही गोष्ट जरांगे इफेक्ट कमी करणारी आहे… पॉलिटिकल स्पेस आंबेडकरांच्या बाजूने झुकणारी आहे… त्यामुळे आंबेडकरांच्या या आरक्षण बचाव यात्रेला नेमका किती आणि कसा प्रतिसाद मिळेल? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…