प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय!! अखेर ‘वंचित’ ची भूमिका जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी सोबत न जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज अपत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. वंचित लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांचा सहयोग वंचित आघाडीला मिळेल असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. एवढच नव्हे तर पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची नावे सुद्धा त्यांनी जाहीर करून टाकली आहेत.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले , काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. दोघांत विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. आम्ही जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील देऊ. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली आहे. जरांगे पाटील यांचा फॅक्टर लक्षात घेणे आवश्यक आहे असं मी महाविकास आघाडीला सांगितलं होते मात्र त्यांनी दुर्लक्ष्य केलं असेही आंबेडकर यांनी म्हंटल.

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी एकूण 7 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे याना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

वंचितने कोणाकोणाची उमेदवारी जाहीर केली-

अकोला : प्रकाश आंबेडकर
भंडारा-गोंदिया : संजय केवट
गडचिरोली : हितेश पांडूरंग मडावी
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंग पवार