हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा वंचितची ताकद दाखवत किमान प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) तरी अकोल्यातून लोकसभेवर जातील, असं वाटतं होतं. पण आंबेडकर निवडणूक हरतायत हे तर आता क्लिअर झालंय. वंचितसाठी हा धक्का न सहन होणार आहेच, पण प्रकाश आंबेडकरांकडून घडलेल्या त्या पाच चुकांमध्ये त्यांचा पराभव दडला होता, असं आता म्हणता येऊ शकतं. वंचितला खासदारकीसाठी वंचित राहावं लागलेल्या त्या पाच चुका नेमक्या कोणत्या आहेत? 2024 च्या निकालामुळे वंचितच्या राजकारणाचा शेवट होऊ शकतो का? अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर शोधूयात
आंबेडकरांकडून घडलेली पहिली चूक ती म्हणजे मविआसोबत जुळवून घेता न येणं…
अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत वंचित आणि मविआतील नेत्यांचा जागा वाटपाचा काथ्यकूट सुरू होता. मविआच्या आघाडीसोबत गेल्यावर आपल्याला 3 ते 4 खासदार निवडून आणता आले असते, याची आंबेडकरांनाही जाणीव होती. पण जास्त पोलिटीकल फोर्स न लागल्याने अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली… यामुळे झालं असं की आघाडी आणि वंचित यांच्यात पुन्हा एकदा मत विभाजन होऊन आंबेडकर बॅकफुटला गेले…
दुसरी चूक म्हणजे विरोधक एकच असल्याचा…
2019 च्या निवडणुकीत वंचित तिसरा पर्याय म्हणून समोर आला. पण यंदा वंचितच्याही टार्गेटवर फक्त आणि फक्त भाजपाच होती. त्यामुळे अकोल्यासह इतर मतदार संघातही वंचितकडे एक तिसरा पर्याय म्हणून पाहिलं गेलंय तसं होताना काही दिसलं नाही. कदाचित आपल्यावर भाजपची बी टीम म्हणून होत असलेल्या आरोपांमुळे आंबेडकर सेफ खेळले असतीलही, पण यामुळे ते निवडणूक हरलेत, हे नाकारता येणार नाही…
तिसरी चूक म्हणजे अकोल्यात न मिळवू शकलेले काँग्रेसचा मदतीचा हात..
वंचितने अनेक मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला… तर कुठे उमेदवारी मागे घेऊन अप्रत्यक्ष मदत केली… पण याबदल्यात काँग्रेसकडून अशी मदत मिळवण्यात प्रकाश आंबेडकरांना यश आलं नाही. त्यातही काँग्रेसने इथून तगडी उमेदवारी दिल्यामुळे अप्रत्यक्ष का होईना पण काँग्रेस आंबेडकरांना मदत करतीये, असं कुठेच दिसलं नाही.
आंबेडकरांच्या अडचणीची ठरलेली चौथी चूक म्हणजे मतदार संघात दिलेला कमी वेळ.
अकोल्यात वंचितचा जरी प्रभाव असला तरी देखील आंबेडकर मतदारसंघात जास्त प्रभावी दिसले नाहीत. म्हणाव्या अशा वादळी सभा, आरोप प्रत्यारोप आणि कट टू कट केलेल्या प्रचारातही आंबेडकर बॅकफुटला दिसले. हेच त्यांना अकोल्यातून मायनसमध्ये घेऊन गेलं असं म्हणता येऊ शकतं…
पाचवी आणि शेवटची चूक सांगता येऊ शकते ती म्हणजे मराठा मतांचं करता न आलेलं कन्वर्जन
अकोल्यात मराठा 25%, तर कुणबी 12 टक्के मतदार आहे. काँग्रेसच्या मराठा उमेदवारीमुळे हा टक्का तुमच्याकडे शिफ्ट होणार, हे तर फिक्स होतं. म्हणूनच मनोज जरांगेंना सोबत घेऊन इथून जातीय ध्रुवीकरण करण्याचा फारसा विचार आंबेडकरांनी केला नाही. याउलट एमआयएमच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे काठावरचा अनेक मराठा मतदार वंचितपासून लांब गेला. एकूणच मतांचं गणित जुळून आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक पातळ्यांवर यश न आल्यानं आंबेडकर यांना यंदाही निकालात म्हणावा असा करिष्मा दाखवता आला नाही, असं म्हणायला नक्कीच स्कोप उरतो… लोकसभेच्या निकालामुळे वंचितच्या राजकारणावर अनेक मर्यादा येतील पण त्यांचं संपूर्ण राजकारणच संपेल, असं म्हणणं जरा अती धाडसाचं होईल. अकोल्यात वंचितला खासदारकीसाठी वंचित का राहावं लागलं? तुमचं विश्लेषण काय सांगतय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.