सोलापूर प्रतिनिधी ।
राज्यात सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने देवीची उपासना करत आहे. काँग्रेसच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनी तब्बल ५ किलोमीटर चालत जाऊन रुपभावानी मातेचे दर्शन घेतलं.
रविवारी पहाटे पाच वाजताच आमदार प्रणिती शिंदे आपल्या सातरस्ता येथील निवासस्थानापासून तुळजापूर रस्त्यावरील रुपभवानी मंदिरात जाण्यासाठी कार्यकर्त्यांसह बाहेर पडल्या. ५ किमी अनवाणी चालत जात त्यांनी हे अंतर पार केलं. नवरात्रीच्या काळात प्रती तुळजाभवानी म्हणून रुपभवानी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी असते. हेच औचित्य साधून आमदार प्रणिती शिंदे यांनी रुपभवानी मातेचं दर्शन घेतलं.तमाम महिलांवर कृपादृष्टी ठेवण्यासाठी साकडं घातल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना तर युतीकडून शिवसेनेने दिलीप माने यांना तिकीट दिलं आहे. दिलीप माने हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे आजी-माजी काँग्रेस आमदाराची लढत सोलापूरमध्ये पाहायला मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या-
‘मोदी तर पेढेवालेसुद्धा’ असं म्हणणार्या उदयनराजेंच्या प्रचाराला पंतप्रधान ‘या’ दिवशी सातार्यात
वाचा बातमी???????? https://t.co/5s8B9cByeN
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2019
Breaking | महादेव जानकर ‘या’ कारणामुळे पडणार महायुतीतून बाहेर?
वाचा बातमी????#hellomaharashtra@BJP4Maharashtra@ShivsenaComms https://t.co/IPPgwx7Stt— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 6, 2019
‘या’ गावात नेत्यांना, अधिकार्यांना गावबंदी, देशात बुलेट ट्रेन झाली पण आमच्या गावात रस्ता नाही असा आरोप@NCPspeaks @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @PMOIndia @NCPpbn https://t.co/9hLfN01Guk
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 6, 2019