मविआकडून लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला; सुशिलकुमार यांची मोठी घोषणा

Sushilkumar shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यापासून मविआतील दोन पक्षांचे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडीतून कोणाला उमेदवारी दिली जाणार आणि कोणता गट बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच सुशिलकुमार शिंदे यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत … Read more

कोण रोहित पवार? काहीजण पोरकट असतात; प्रणिती शिंदेंनी फटकारले

Praniti Shinde Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कुरघोडी पहायला मिळत आहे. सोलापूर मध्ये काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असून हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडावा असं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर कोण रोहित पवार? असा सवाल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना फटकारले आहे. सोलापुरात काँग्रेस आमदार … Read more

काँग्रेस आमदाराच्या वाढदिवसानिमित्त मोफत पेट्रोलचे वाटप; कुठे आहे हा उपक्रम?

Birthday Congress Praniti Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस म्हंटलं कि मतदारसंघात अनेक उपक्रमाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जेवणावळी घातल्या जातात. पण राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या शिंदे कुटूंबातील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस एका वेगळ्या उपक्रमामुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आज आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्त सोलापूर शहर उत्तर युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील … Read more

योगी महाराजांची जागा मठात; प्रणिती शिंदेंची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे. योगी यांची जागा राजकारणात नसून मठात आहे. सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप सरकारचा समाचार घेत कृषी कायद्यासह अन्य मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले. योगी, महाराज यांच्याबद्दल आहे आम्हाला मान पण त्यांचं … Read more

ईडीची आता पान-तंबाखूच्या दुकानासारखी गत झालीय; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे एनसीबीच्यावतीने तर दुसरीकडे ईडीच्यावतीने राज्यात कारवायांचे धाड सत्र सुरु आहे. या धाड सत्रावरून काँग्रेस नेत्या तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी ईडी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “राज्यात ईडीच्या कारवाईबाबत सांगायचे झाले तर ईडीची आता पान-तंबाखूच्या दुकानासारखी गत झाली आहे. आणि पंतप्रधानाच्या डोक्यात तर सत्तेचा मगरुरपणा शिरला आहे,” … Read more

भाजप आणि मोदी सरकारच्या मग्रुरीविरोधात बंद; प्रणिती शिंदेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. याबाबत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. “भाजप सरकार देशातील लोकांचा अंत पाहत आहे. आजचा हा बंद हा भाजप आणि मोदी सरकारच्या मग्रुरीविरोधात  पुकारण्यात आलेला आहे. … Read more

जिल्ह्यात अनुसूचित जाती कल्याण समितीचा 24, 25 रोजी दौरा

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात अनुसूचित जाती कल्याण समितीचा दौरा 24 व 25 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात आहे. विधानसभा सदस्य तथा समितीच्या प्रमुख प्रणिती शिंदे आहेत. तर समितीचे सदस्य म्हणून आमदार डॉ. बालाजी किणीकर, संतोष बांगर, यशवंत माने, डॉ. किरण लहामटे, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, टेकचंद सावरकर, प्रा.नरेंद्र भोंडेकर, अरूण लाड, राजेश राठोड, विजय … Read more

एमआयएम, वंचित हे देशाची फाळणी करणारे पक्ष; आमदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर एमआयएम व वंचीत बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. दरम्यान एमआयएमच्या नेत्यांनीही काँग्रेसवर टीका केल्याने काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीवर हल्लाबोल केला. एमआयएम, वंचित हे दोन्ही पक्ष देशाची फाळणी करणारे आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली आहे. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून महाविकास … Read more

शरद पवारांबद्दल प्रचंड आदर, पण..; यूपीए अध्यक्ष पदाबाबत आणखी एका काँग्रेस नेत्याची ठाम भूमिका

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. परंतु राऊतांच्या या मागणीमुळे महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नंतर आता प्रणिती शिंदे यांनी देखील सोनिया गांधी याच आमच्या नेत्या असल्याचे म्हंटल आहे. … Read more

अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र नाना पटोलेंच्या हाती; प्रणिती शिंदेंसह ‘या’ नेत्यांना नवी जबाबदारी

मुंबई । विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षसोबतच काँग्रेसचे ६ कार्यकारी अध्यक्षपदाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी गुरुवारीच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर आज ही घोषणा करण्यात आली आहे. नव्या प्रदेश … Read more