औरंगाबाद | आमदार प्रशांत बंब यांचा शेतात काम करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या मान्सून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी आणि शेतीतील कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. प्रशांत बंब यांनादेखील शेतात गेल्यास शेतीकाम करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी थेट नांगराचा कासरा हातात घेत वखरणी व नांगरणीला सुरुवात केली.
माळी वडगाव येथे ही घटना घडली. बंब यांनी पीक पेरणीचे काम करायला सुरुवात केली याचा व्हिडिओची चर्चा केली जात आहे. शेतकऱ्यांनी शेतीपिकाची काळजी घ्यावी असे आवाहन देखील आमदार बंब यांनी केले आहे.
पहा व्हिडीओ :
https://twitter.com/AurangabadHello/status/1406858375418191876?s=08
राजकारणात प्रशांत बंब अग्रेसर आहेत. याबरोबरच समाजकारणातही ते वेळोवेळी पुढाकार घेतात. काही दिवसापूर्वी आमदार बंब यांनी कोरोनाग्रस्तांसाठी 100 बेडचे सुसज्ज असे स्वतंत्र कोविड केअर सेंटरची उभारणी केली होती तेव्हाही ते चर्चेत आले होते.