नाट्यरसिक उत्तम, मात्र रस्ते थर्डक्लास- प्रशांत दामले

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी। ‘कल्याणमधील नाट्यरसिक उत्तम आहेत मात्र कल्याणातील रस्ते थर्डक्लास’ अशी शाल झोडीत पोस्ट प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर केली. कारण कल्याणमध्ये रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हेच कळायला मार्ग नाही. त्यामुळं येथील रस्त्याच्या दुर्दशेबबाबत दामले यांनी ही पोस्ट केली.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी डोंबिवलीतील रस्त्यांचा उद्धार करून अवघे काही दिवसही उलटले नाहीत. तोच आता हा रस्ता पुरता खराब झाला आहे. रस्त्यात मोठे खड्डे पडल्याने नागरिकांचे मोठे हाल होतायेत. त्यामुळं ‘कल्याणात नाट्यरसिक उत्तम आहेत मात्र कल्याणातील रस्ते थर्डक्लास’ असल्याची पोस्ट करीत प्रशांत दामले यांनी शासकीय यंत्रणांवर आगपाखड केलीये.

रविवारी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात प्रशांत दामले ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाच्या प्रयोगासाठी आले होते. मात्र कल्याणातील रस्त्यांमुळे त्यांना प्रवासात खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळं न राहवून त्यांना रस्त्यांच्या दुर्दशेबाबत आपल्या भावना व्यक्त कराव्या लागल्या. आधी पंडीत हृदयनाथ आणि आता प्रशांत दामले यांनी कल्याण डोंबिवलीकरांना रोज भोगाव्या लागणाऱ्या समस्येला पुन्हा एकदा वाचा फोडली आहे. तेव्हा आता प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेते हे पहाण महत्वाचं ठरेल.