हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prathamesh Parab Engagement) अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या दगडूला अखेर त्याची रिअल लाईफ प्राजु मिळाली आहे. ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत होता. प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची कबुली दिल्यापासून चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. अशातच नुकताच ‘व्हेलेंटाईन डे’ दिवशी प्रथमेश आणि क्षितीजाचा धुमधडाक्यात साखरपुडा पार पडला.
जानेवारी २०२४ मध्ये केळवणाचे फोटो शेअर करत प्रथमेश परबने त्याचा साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर केली होती. यानंतर बुधवारी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी व्हेलेंटाईन डे’चा मुहूर्त साधत प्रथमेश परब आणि क्षितिज घोसाळकर यांचा साखरपुडा पार पडला. दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्यातील काही खास फोटो प्रथमेश आणि क्षितिजने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
हे फोटो शेअर करताना प्रथमेशने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आमचा व्हॅलेंटाईन डे असा साजरा झाला… इथून पुढे आयुष्यभराची साथ राहील’. (Prathamesh Parab Engagement) साखरपुड्यासाठी प्रथमेश आणि क्षितिजाने अत्यंत साधा आणि पारंपरिक लूक केला होता. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, साखरपुड्यासाठी प्रथमेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची सुंदर अशी पैठणी साडी नेसली होती. दोघांचेही चाहते त्यांच्या या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
प्रथमेश आणि क्षितिजाची लव्हस्टोरी (Prathamesh Parab Engagement)
अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिज घोसाळकर यांची ओळख सोशल मीडिया इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. पुढे बोलणं वाढलं, मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. अभिनेत्याने पहिल्यांदा १४ फेब्रुवारी २०२० रोजी ‘व्हेलेंटाईन डे’निमित्त क्षितिजाने केलेल्या फोटोशूट सीरिजचे कौतुक करण्यासाठी तिला मॅसेज केला होता. त्यानंतर बरोबर वर्षभरात त्यांचं सूत जुळलं आणि १४ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. (Prathamesh Parab Engagement) यानंतर १४ फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली. आता ज्या दिवशी त्यांनी साखरपुडा केला तो दिवसही व्हेलेंटाईन डे असून त्यांच्या नात्याला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा दिवस दोघांसाठीसुद्धा फार खास ठरला आहे.