पेट्रोल महागल्यामुळे गर्लफ्रेंडला भेटता येत नाही म्हणून बॉयफ्रेंडने मांडली आपली व्यथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या दरवाढीला जनता पूर्णपणे वैतागली आहे. या पेट्रोलच्या किमतींसोबतच दूध, भाजीपाला, लिंबू यांसारख्या वस्तूही महागल्या आहेत. या गोष्टीला विरोध करण्यासाठी काही जण मीम्स बनवत आहेत तर काही त्यावर गाणी गाऊन विरोध करत आहेत. आपल्या देशात टॅलेंटची अजिबात कमी नाही आहे. ते परिस्थितीनुसार आपले टॅलेंट दाखवत असतात.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/374774924702166

सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो गाण्याच्या माध्यमातून आपल्या गर्लफ्रेंडला सांगत आहे की, पेट्रोल खूप महाग झाले आहे, तर मला सांग मी तुला भेटायला कसा येऊ? या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, त्या व्यक्तीला त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल येतो आणि ती त्याला भेटायला येत नाही म्हणून तक्रार करते. यावर तो माणूस महागाईमध्ये पेट्रोलच्या वाढत्या किमतींवर एक गाणे गातो आणि त्याच्या मैत्रिणीला सांगतो की तेलाच्या किमती खूप वाढल्या आहेत म्हणून तो येऊ शकत नाही.

‘मागधी बॉईज’ नावाच्या फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “पेट्रोल सजनी मगही गाणे” असे या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment